शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

पाणीपट्टी, घरपट्टीचा ग्रामपंचायतीवर डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 00:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़

ठळक मुद्देवसूली २० टक्के : घरपट्टीचे १७ कोटी तर पाणीपट्टीचे १० कोटी थकीत

विशान सोनटक्के।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या उत्पन्नाची मदार पाणीपट्टी आणि घरपट्टी या दोन मुख्य आर्थिक स्त्रोतावर अवलंबुन असते़ मात्र या दोन्हीच्या थकबाकीचा डोंगर ग्रामपंचायतीवर वाढत असल्याचे दिसून येते़ पाणीपट्टीचे तब्बल १० कोटी ६० लाख थकीत आहेत़ तर घरपट्टीचाही १७ कोटी २४ लाख ६० हजाराचा डोंगर झाला आहे़ विशेष म्हणजे वसुलीची टक्केवारी अवघी २० टक्के असल्याचे दिसून येते़जिल्ह्यातील १६ तालुक्यांकडे २०१७-१८ अखेरची २ कोटी ९ लाख ६४ हजाराची थकबाकी आहे़ तर याच कालावधीतील पाणीपट्टीचे १ कोटी १८ लाख ९० हजार रुपये थकीत आहेत़ तालुकानिहाय घरपट्टीची थकबाकी पाहता नांदेड तालुका २० लाख ५८ हजार, अर्धापूर ४ लाख १९ हजार, मुदखेड ३ लाख १० हजार, कंधार १५ लाख ३० हजार, मुखेड १८ लाख ८ हजार, देगलूर २१ लाख ५० हजार, बिलोली १२ लाख ११ हजार, नायगाव २३ लाख ९२ हजार, धर्माबाद ९ लाख ४५ हजार, हदगाव १७ लाख ५ हजार, किनवट २० लाख ४४ हजार, भोकर ५ लाख ३८ हजार, हिमायतनगर ९ लाख १० हजार, माहूर ६ लाख ५६ हजार, उमरी ६ लाख ३ हजार तर लोहा तालुक्याची घरपट्टीची थकबाकी १६ लाख ८५ हजार एवढी आहे़ २०१७-१८ मधील घरपट्टीच्या या थकीत रक्कमे दिवसेंदिवस वाढ होत आहे़दुसरीकडे पाणीपट्टी वसुलीची स्थितीही अशीच आहे़ जुलै अखेरपर्यंतच्या उपलब्ध आकडेवारीनुसार पाणीपट्टची मागील थकबाकी १ कोटी १८ लाखावर जावुन पोहोंचली आहे़ यात नांदेड तालुका ४ लाख ७० हजार, अर्धापूर ९ लाख ९९ हजार, मुदखेड १ लाख ३ हजार, कंधार ३ लाख ६२ हजार, मुखेड १२ लाख ९६ हजार, देगलूर ५ लाख ५२ हजार, बिलोली ४ लाख ५० हजार, नायगाव १० लाख ७४ हजार, धर्माबाद ४ लाख ५३ हजार, हदगाव १६ लाख ६४ हजार, किनवट ११ लाख २० हजार, भोकर ४ लाख ५८ हजार, हिमायतनगर ९ लाख २६ हजार, माहूर ४ लाख ५२ हजार, उमरी ५ लाख ५ हजार तर लोहा तालुक्यात १० लाख ६ हजाराची पाणीपट्टी थकीत आहे़घरपट्टी आणि पाणीपट्टीच वसुल होणार नसेल तर ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी कसा उपलब्ध होणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असल्याने ग्रामस्थांकडील थकीत घरपट्टी, पाणीपट्टी वसुलीसाठी आता विशेष मोहिम राबविण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे़जुनी थकबाकी ठरतेय डोकेदुखीपाणीपट्टी आणि घरपट्टीचीही मागील थकबाकी वसुल होण्यास अडचणी येत असल्याने थकबाकीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे़ २ कोटी ९ लाखांची २०१७-१८ मधील घरपट्टी थकीत आहे़ यातील ७१ लाख ४४ हजार वसुली करण्यात यश आले आहे़ अशीच स्थिती पाणीपट्टीच्या बाबतीतही दिसून येते़ २०१७-१८ मधील १ कोटी १८ लाख ९० हजाराची थकीत असून जुलै अखेरपर्यंत ४४ लाख ७७ हजार रुपयांची वसुली झाली आहे़ दर महिन्याच्या घर आणि पाणी पट्टीची रक्कम वाढत असतानाच जुनी थकबाकी वसुली अडचणी येत असल्याचे दिसून येते़स्थिती दयनीयपाणीपट्टी आणि घरपट्टी वसुलीत सर्वच तालुक्याची स्थिती दयनीय असल्याचे दिसून येते़ नांदेड तालुका पाणीपट्टीची वसुली २२़६२ टक्के, अर्धापूर १६़८० टक्के, मुदखेड २०़८७ टक्के, कंधार ३५़२८ टक्के, मुखेड १६़४९ टक्के, देगलूर १६़४५ टक्के, बिलोली १६़६४ टक्के, नायगाव २४़७२ टक्के, धर्माबाद २०़५८ टक्के, हदगाव १९़५२ टक्के, किनवट २१़३० टक्के, भोकर २३़४८ टक्के, हिमायतनगर २०़५५ टक्के, माहूर १९़४४ टक्के, उमरी ३०़१२ टक्के तर लोहा तालुक्याचे प्रमाणे २१़०८ टक्के इतके आहे़ घरपट्टीच्या वसुलीचीही अशीच स्थिती आहे़

टॅग्स :NandedनांदेडNanded zpनांदेड जिल्हा परिषदWaterपाणीgram panchayatग्राम पंचायत