नांदेडातील महामार्ग केंद्रे औरंगाबाद विभागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:18 IST2021-04-27T04:18:24+5:302021-04-27T04:18:24+5:30

नांदेडहून नागपूरला जाण्या-येण्यासाठी पुणे-औरंगाबाद-मुंबईच्या तुलनेत रेल्वे किंवा इतर वाहने वेळेवर नसल्यामुळे नागपूरला ये-जा करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथक केंद्र नांदेड ...

Highway centers in Nanded in Aurangabad division | नांदेडातील महामार्ग केंद्रे औरंगाबाद विभागात

नांदेडातील महामार्ग केंद्रे औरंगाबाद विभागात

नांदेडहून नागपूरला जाण्या-येण्यासाठी पुणे-औरंगाबाद-मुंबईच्या तुलनेत रेल्वे किंवा इतर वाहने वेळेवर नसल्यामुळे नागपूरला ये-जा करण्यासाठी महामार्ग सुरक्षा पथक केंद्र नांदेड व बारडचे अधिकारी व कर्मचाऱ्यांना, तसेच काही दिवसांतच सुरू हाणारे तिसरे केंद्र देगलूर यांना मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे या अडचणींचा विचार करून नांदेड, बारड, देगलूर हे महामार्ग सुरक्षा पथक प्रादेशिक विभाग नागपूरमधून वगळून नव्याने मंजूर झालेल्या औरंगाबाद सुरक्षा पथक प्रादेशिक विभागाशी जोडावे, अशी मागणी करण्यात येत होती. त्यात सोमवारी याबाबतचे आदेश धडकले. औरंगाबाद हे वाहतूक परिक्षेत्र करण्यात आले असून पोलीस अधीक्षक म्हणून अनिता जमादार यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नांदेडातील सर्व महामार्ग केंद्रे आता औरंगाबाद परिक्षेत्राशी जोडण्यात आली आहेत. त्यामुळे नांदेडकरांची मागणी पूर्ण झाली आहे.

Web Title: Highway centers in Nanded in Aurangabad division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.