Highest bid rich ghazal | सर्वोच्च बोली धनज घाटाला
सर्वोच्च बोली धनज घाटाला

ठळक मुद्देमहसूल विभाग वाळू घाटांचे दोन लिलाव पूर्ण तिसऱ्या लिलाव प्रक्रियेची तयारी

नांदेड : राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरणविषयक मान्यता दिल्यानंतर जिल्ह्यात झालेल्या वाळू लिलावाच्या दोन फेऱ्यानंतर महसूल विभागाला २७ कोटी ९३ लाख ८७ हजार रुपयांचा विक्रमी महसूल प्राप्त झाला आहे. यात नायगाव तालुक्यातील धनज वाळू घाटाला सर्वाधिक ५ कोटी ९१ लाख ३१ हजार ४० रुपये सर्वोच्च बोली मिळाली आहे.
पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये होणारी लिलाव प्रक्रिया जिल्ह्यात यंदा मार्च महिन्यात सुरू झाली. जिल्ह्यात यावर्षी १२८ वाळू घाटांची लिलावासाठी पाहणी करण्यात आली होती. यापैकी ३१ वाळूघाटांना वाळू उपसा करण्याची परवानगी विभागीय आयुक्तांकडून प्राप्त झाली. पर्यावरण विभागाच्या मान्यतेअभावी लिलाव प्रक्रिया तीन महिने रखडली. राष्ट्रीय हरित लवादाने वाळू उपशासाठी आवश्यक असलेली पर्यावरण विषयक मान्यता देण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीकडून काढून घेतले होते.
सदर परवानगीचे अधिकार राज्यस्तरीय समितीकडे देण्यात आले होते. त्यानंतर राज्यस्तरीय पर्यावरण आघात व्यवस्थापन प्राधिकरणाने मान्यता दिली. त्यानंतर २९ वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया पहिल्या टप्प्यात करण्यात आली. दुसरा टप्पाही पूर्ण झाला आहे.
यात नायगाव तालुक्यातील धनज या वाळू घाटाला ५ कोटी ५१ लाख ३१ हजार रुपये सर्वोच्च बोली मिळाली. या खालोखाल नायगाव तालुक्यातीलच मेळगाव घाटास ३ कोटी ५१ लाख ४२ हजार ५२४ रुपयांची बोली लावली. उमरी तालुक्यातील इरंडल या घाटाला ३ कोटी ३३ लाख ११ हजार, देगलूर तालुक्यातील शेळगाव २ या घाटास २ कोटी ६९ लाख ८८ हजार रुपये, उमरी तालुक्यातील महाटी घाटास १ कोटी ९५ लाख १ हजार रुपये, बिलोली तालुक्यातील बोळेगाव घाटास १ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये, उमरी तालुक्यातील कौडगाव घाटास २ कोटी १० लाख ८६ हजार रुपये, बिलोली तालुक्यातील सगरोळी घाटास १ कोटी ५४ लाख ९९ हजार रुपये, माचनूर घाटास १ कोटी ७३ लाख २७ हजार रुपये, कार्ला (बु.) ५७ लाख ४ हजार, गंजगाव-२, १ कोटी ४४ लाख ५ हजार रुपये, देगलूर तालुक्यातील तमलूर घाटास ९४ लाख १ हजार रुपये, सांगवी उमर ७१ लाख आणि मेदनकल्लूर घाटास ५५ लाख ५५ हजार ५५१ रुपये बोली मिळाली. या लिलाव प्रक्रियेतून २७ कोटी ९३ लाख ८७ हजार ३५९ रुपयांचा महसूल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे.

  • वाळू लिलावातून मराठवाड्यात सर्वाधिक महसूल मिळविण्याचे काम नांदेड जिल्ह्याने केले आहे. मराठवाड्याची राजधानी मानल्या जाणाºया औरंगाबाद जिल्हा प्रशासनाला केवळ १५ लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. परभणी जिल्ह्याला ६० कोटी ५ लाख रुपये महसूल मिळाला आहे. दुसरीकडे हिंगोली, लातूर, बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यात लिलाव प्रक्रिया सुरूच झाली नाही. जालना जिल्ह्यात लिलाव प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. पहिल्या दोन लिलाव प्रक्रियेत सर्वाधिक महसूल देणारा बिलोली तालुका मागे पडला असून नायगाव तालुका अव्वलस्थानी पोहोचला आहे.

Web Title: Highest bid rich ghazal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.