मेडिकलसाठी जाणारेच होते रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:16 IST2021-04-12T04:16:41+5:302021-04-12T04:16:41+5:30
चौकट... विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी रविवारी रस्त्यावर आढळून आलेल्या नागरिकांपैकी बहुतांश जणांनी गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाइकांसाठी औषधी आणायला बाहेर आल्याचे ...

मेडिकलसाठी जाणारेच होते रस्त्यावर
चौकट...
विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी
रविवारी रस्त्यावर आढळून आलेल्या नागरिकांपैकी बहुतांश जणांनी गृहविलगीकरणात असलेल्या नातेवाइकांसाठी औषधी आणायला बाहेर आल्याचे सांगितले, तर अनेकजण कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला जेवणाचा डबा देण्यासाठी आल्याचे दिसून आले. प्रशासनातर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत नसली तरीही विनाकारण रस्त्यावर आलेल्यांची कोराेना तपासणी केली जात होती. या तपासणीच्या भीतीनेही अनेकांनी घराबाहेर येणे टाळले.
रविवारी शहरात होता शुकशुकाट....
मागील काही दिवसांत वारंवार आवाहन करूनही नागरिक विनाकारण फिरत असल्याचे आढळून आले होते. या नागरिकांना किराणा दुकानासह इतर कारणेही होती. मात्र, औषधी दुकाने आणि मेडिकल वगळता इतर सर्व आस्थापना बंद ठेवल्याने रविवारी शहरातील विविध भागात शुकशुकाट दिसून आला.
घराबाहेर पडण्याची ही आहेत कारणे...
शनिवार आणि त्यानंतर रविवारी रस्त्यावर शुकशुकाट होता. रस्त्यावर आलेले बहुतांशजण औषध खरेदी, कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाला डबा पोहोचविणे याबरोबरच रेमडेसिविर इंजेक्शनसाठी बाहेर पडल्याचे दिसून आले.