रक्तदान करुन साखरपुड्यातच झाले विवाहबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:21 IST2021-02-25T04:21:55+5:302021-02-25T04:21:55+5:30

संदीप सोनकांबळे यांचे कांही दिवसांपूर्वी हडको येथील बसवेश्वर नगरात राहणारे रविदास चित्ते यांची कन्या सिमा हीच्यासोबत विवाह निश्चित झाला. ...

He got married in Sakharpud by donating blood | रक्तदान करुन साखरपुड्यातच झाले विवाहबध्द

रक्तदान करुन साखरपुड्यातच झाले विवाहबध्द

संदीप सोनकांबळे यांचे कांही दिवसांपूर्वी हडको येथील बसवेश्वर नगरात राहणारे रविदास चित्ते यांची कन्या सिमा हीच्यासोबत विवाह निश्चित झाला. विवाहापूर्वीचा साक्षीगंध सोहळा सिडको येथील साईदत्त मंगल कार्यालयात ठरविण्यात आला. मात्र कोरोनाचा वाढता धोका व लग्नासाठी हिच मंडळी पुन्हा उपस्थित राहणार ही बाब लक्षात घेऊन काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे यांनी सोनकांबळे व चित्ते कुटूंबियांशी चर्चा करुन साक्षीगंध सोहळ्यात लग्न लावण्याची सूचना केली. माजी पालकमंत्री डी.पी. सावंत व आ. मोहन हंबर्डे यांनीही याबाबत आग्रह धरला. त्यानंतर दोन्ही कुटूंबियांनी लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार साक्षीगंध सोहळ्यातच विवाह संपन्न झाला. विवाहाच्या प्रारंभी कोरोनाचा पार्श्वभूमिवर नववधू-वरासह ५० हून अधिक जणांनी रक्तदान करुन आणखी एक चांगला पायंडा पाडला

Web Title: He got married in Sakharpud by donating blood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.