शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना काळाचा घाला; हायवाने दोघांना चिरडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2023 16:26 IST

चालकाचे भरधाव वेगातील हायवावरील नियंत्रण सुटले, दुचाकीवरील दोघांना चिरडले

- राजेश वाघमारेभोकर : तालुक्यातील हाडोळी येथून कुंटुर ( ता.नायगाव) येथे दोघेजण दुचाकीवरून जात असतांना उमरी रस्त्यावरील मोघाळी जवळ एका हायवाने दुचाकीस जबर धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली आहे. संजय साहेबराव जाधव (४४) व शामराव पुंडलिक पाटील मिराशे (५५, दोघे रा. हाडोळी ता. भोकर ) अशी मृतांची नावे  आहेत. 

आज दुपारी संजय जाधव आणि शमराव मिराशे हे दोघे दुचाकीवरून (क्र. एम एच २६ बीएल ७६४२) उमरी मार्गे कुंटुर ( ता. नायगाव ) येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जात होते. दुपारी दोन वाजेदरम्यान, मोघाळी जवळ उमरीकडून भोकरकडे येणाऱ्या भरधाव हायवाने (क्र. एम.एच. २६ बीई २२६७) समोरून येणाऱ्या दोघांच्या दुचाकीस जबर धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. मयत दोघेही शेतकरी आहेत. घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. 

एक अंत्यविधी आटोपून दुसऱ्या अंत्यविधिला जाताना अपघात मयत संजय जाधव हे नात्यातील भावजयीचा सकाळी अंत्यविधी आटोपून गावातील मित्राच्या सासऱ्याच्या अंत्यविधीसाठी कुंटुर येथे जात होते. संजय जाधव यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तर मयत शामराव मिराशे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, २ मुली आहेत. हाडोळी गावातील दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याने गवावर शोककळा पसरली होती.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेड