शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
2
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
3
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
4
Viral Video : नवी नवरी सोबत बॉयफ्रेंडलाही घेऊन आली; सासरच्या घरात कुठे लपवला व्हिडीओ बघाच
5
...तर १ जानेवारी २०२६ पासून तुमचं पॅन बंद होईल; बँक व्यवहारांसह सर्व महत्त्वाची कामं अडकतील
6
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
7
Claudia Sheinbaum: सुरक्षा भेदून क्लाउडिया शीनबामपर्यंत पोहोचला; भररस्त्यात स्पर्श आणि चुंबनाचा प्रयत्न!
8
भाजीवाल्याने मित्राकडून पैसे उधार घेतले अन् जिंकले ११ कोटी; आता देणार मोठं 'थँक यू' गिफ्ट
9
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
10
Numerology: अंकशास्त्रानुसार आपल्यासाठी कोणत्या जन्मतारखेची व्यक्ती परफेक्ट जोडीदार असते?
11
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
12
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
13
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
14
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
15
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
16
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
17
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
18
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
19
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
20
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी

लोकसभेत आमदारांची सत्वपरीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 00:40 IST

नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देइच्छूकांकडून विधानसभेची मोर्चेबांधणीमताधिक्य मिळवून देण्यासाठी लावणार जोर

विशाल सोनटक्के।नांदेड : नांदेड लोकसभेच्या रणधुमाळीला वेग आला आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे अशोकराव चव्हाण, भाजपाचे प्रताप पाटील चिखलीकर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. यशपाल भिंगे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात असून, वर्चस्वाच्या लढाईला सुरुवात झाली आहे. मात्र लोकसभेचे हे मैदान मतदारसंघातील सहाही आमदारांची सत्व परीक्षा पाहणारे ठरणार आहे. सर्वाधिक तीन विधानसभा ताब्यात असल्याने लोकसभा मतदारसंघातही काँग्रेसचे वर्चस्व दिसते.मागील लोकसभा निवडणुकीकडेही राज्याचे लक्ष लागले होते. मात्र काँग्रेसच्या अशोकराव चव्हाण यांनी मोदी लाटेतही काँग्रेसचा हा बालेकिल्ला तब्बल ८१ हजारांहून अधिक मताधिक्याने कायम ठेवला होता. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे काँग्रेसच्या नांदेडमधील वर्चस्वावर शिक्कामोर्तब झाले होते. मात्र त्याचवेळी केंद्रात सत्ता परिवर्तन करण्यात भाजपा यशस्वी ठरली. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीवेळी महाराष्टÑात युतीच्या आकांक्षा वाढल्या होत्या. मात्र त्यानंतरही काँग्रेसने लोकसभा मतदारसंघातील ६ पैकी भोकर, नायगाव आणि नांदेड उत्तर मतदारसंघात विजय मिळवून आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले होते. मुखेड या एकमेव विधानसभा मतदारसंघात भाजपाचे कमळ फुलले तर लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून आ. प्रताप पाटील चिखलीकर तर देगलूर मतदारसंघातून सुभाष साबणे यांनी शिवसेनेचा भगवा फडकाविला. या सर्व सहाही आमदारांची आता लोकसभा निवडणुकीत कसोटी लागणार आहे.लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुकींना सामोरे जावे लागणार आहे. या अनुषंगाने विधानसभेच्या सर्वच इच्छुक उमेदवारांचा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारातच विधानसभेचेही घोडे न्हाहून घेण्याचा प्रयत्न असणार आहे. आपल्या पक्षाला आपल्या मतदारसंघातून आपण किती मताधिक्य देतो ? यावर या इच्छुकांना विधानसभेची उमेदवारी मिळणार आहे. या बरोबरच अवघ्या काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने पक्षाचा जोर लोकसभा निवडणुकीपासून विधानसभेपर्यंत कायम ठेवण्याचाही या इच्छूकांचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळेच विद्यमान आमदारांसह इच्छुकांनाही लोकसभेच्या प्रचारात आपली ताकद दाखवावी लागणार आहे. या परीक्षेत कोणते इच्छुक उत्तीर्ण होतात, याचा निकाल लोकसभेच्या निकालावेळीच लागणार आहे.काँग्रेसकडे सर्वाधिक तीन विधानसभा१९५१ ते २०१४ या कालावधीत नांदेड लोकसभा मतदारसंघात १५ निवडणुका पार पडल्या. यातील तब्बल १२ निवडणुकांत काँग्रेसने झेंडा फडकावित नांदेडचा बालेकिल्ला राखलेला आहे. केवळ ३ वेळा या मतदारसंघातून मतदारांनी विरोधकांना संधी दिली. १९७७ मध्ये शेकापच्या केशव धोंडगे यांनी विजय मिळविला होता. १९८९ मध्ये जनता दलाच्या तिकीटावर डॉ. व्यंकटेश काब्दे विजयी झाले होते. तर २००४ मध्ये डी. बी. पाटील यांच्या रुपाने या मतदारसंघात भाजपाला एकदाच गुलाल उधळण्याची संधी मिळाली होती. मागील विधानसभा निवडणुकांची आकडेवारी पाहिल्यानंतर याही लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पारडे जड दिसते. काँग्रेसच्या ताब्यात तीन मतदारसंघ आहेत. तर भाजपा अवघ्या एका विधानसभेचे प्रतिनिधीत्व करते. मित्र पक्ष शिवसेनेचे दोन आमदार आहेत.नांदेड शहराचे भाजपासमोर आव्हानकेंद्र आणि राज्यातील सत्तेच्या बळावर २०१८ मध्ये झालेल्या नांदेड महापालिका निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न भाजपाने केला खरा.मात्र येथे भाजपा तोंडघशीच पडली. ५३ प्लसचा संकल्प करुन मैदानात उतरलेल्या भाजपाला दोन आकडी संख्याही गाठता आली नाही. काँग्रेसने येथे एकहाती विजय मिळवित ८१ पैकी तब्बल ७३ जागा जिंकल्या. निवडणूक काळात भाजपाने नांदेडच्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र तो पडला नाही. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभेनंतरही सेनेला कशीबशी एक जागा जिंकता आली. त्यामुळे नांदेड शहरातील मतदारांना आपल्याकडे खेचण्याचे याहीवेळी भाजपासमोर मोठे आव्हान उभे आहे. यात ते कितपत यशस्वी होतात ते निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. दूसरीकडे वंचित बहुजन आघाडीचाही नांदेड शहरातून अधिकाधिक मते खेचण्याचा प्रयत्न असणार आहे.नांदेड लोकसभेच्या प्रचार रणधुमाळीने वेग घेतला आहे़ प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात गाठीभेटीसह यंत्रणा कामाला लावण्यामध्ये उमेदवार मग्न होते़ आता त्या उमेदवारांनी बैठका, कॉर्नर सभांवर भर दिला आहे़ पुढच्या टप्प्यात दिग्गज नेत्यांच्या प्रमुख पक्षांकडून सभा होणार आहेत़ त्यानंतरच प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचणार आहे़ या सभांचेही नियोजन सुरू आहे़

टॅग्स :nanded-pcनांदेडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपाcongressकाँग्रेस