नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:36 IST2019-03-07T00:36:15+5:302019-03-07T00:36:50+5:30
महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले़

नांदेड मनपाचा अतिक्रमणावर हातोडा
नांदेड : महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने बुधवारी शहरातील मुख्य बाजारपेठेसह नवीन नांदेड भागातही अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई केली़ रहदारीला अडथळा निर्माण करणारे हातगाडे, पानटपऱ्या, रस्त्यावर ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़ तर नाल्यांवर केलेले बांधकाम जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आले़
महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसांपासून शहरातील रस्ते मोकळे करण्यासाठी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आली आहे़ या मोहिमेअंतर्गत कारवाईचा वेग वाढविण्यात आला आहे़ बुधवारी सकाळी साडेआठ वाजता या मोहिमेला सुरुवात करण्यात आली होती़ शिवाजीनगर, फुले मार्केट, सिडको, ढवळे कॉर्नर, शिवाजी चौक, अण्णाभाऊ साठे चौक, हडको चौरस्ता, कलामंदिर, आयटीआय रस्ता व फुटपाथवरील रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या पानटप-या, चहाच्या टप-या, हातगाडे, विक्रेत्यांनी ठेवलेले साहित्य जप्त करण्यात आले़
तसेच नाल्यावरील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली़ रविवारी बाजार हडको येथील गयाबाई सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार राम मंदिर हडकोकडे जाणारा पाच फुटांचा रस्ता अतिक्रमण करुन बंद करण्यात आला होता़
हा रस्ता मोकळा करण्यात आला़ आयुक्त लहुराज माळी, उपायुक्त संधू यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन विभाग प्रमुख रईस पाशा, क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे, विलास गजभारे, उपअभियंता शिंदे, पोलीस पथक प्रमुख काझी यांनी ही कारवाई केली़