शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

लोहा, कंधार, नायगाव तालुक्यांत पुन्हा ‘गारपीट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2018 23:58 IST

सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.

ठळक मुद्देकिनवट तालुक्यात ३ हजार तर धर्माबादेत १२०० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : सोमवारी सायंकाळी जिल्ह्यातील हिमायतनगर, लोहा, कंधार, मुखेड, हदगाव, धर्माबाद, नायगाव, उमरी तालुक्यात ‘गारपिटी’ने थैमान घातले. वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीने गहू, हरभरा आदी प्रमुख पिके आडवी पडली. शेतक-यांवर एकापाठोपाठ एक संकटाची मालिकाच सुरुच आहे.लालवंडी (ता.नायगाव) येथे झाडावरील ५० बगळे गारपिटीच्या तडाख्यात सापडून दगावले. उर्वरित ५० जखमी झाले. तालुक्यातील तलबीड, कोलंबी, मांजरम, पळसगाव, टाकळगाव, गोदमगाव, अंचोली, लालवंडी, देगाव, कुंटूर, नरगंल आदी गावांतील शेतीचे मोठे नुकसान झाले. देगाव येथे आ. वसंतराव चव्हाण, ना. तहसीलदार नंदकिशोर भोसीकर, मंडळाधिकारी कळकेकर, तलाठी बालाजी राठोड यांनी भेट दिली.

वहाबोद्दीन शेख।लोकमत न्यूज नेटवर्कनायगाव बाजार: तालुक्यात लालवंडी, ताकबीड, तलबीड, कुंटूर , पळसगाव, देगाव, नायगाव आदी भागात गारपीट झाली़ तालुक्यात एकूण १६़६ मि़मी़ पाऊस झाला. सर्कलनिहाय पाऊस याप्रमाणे- नायगाव २८ मि़मी़, कुंटूर २० मि़मी़, बरबडा २५ मि़मी़, मांजरम ७ मि़मी़, नरसी ३ मि़मी़ असे एकूण १६़६ मि़मी़ सरासरी पाऊस झाला़सुनील चौरे।लोकमत न्यूज नेटवर्कहदगाव: तालुक्यात २५ ते ३० गावे बाधित झाली. मंगळवारी आ़ नागेश पाटील, तहसीलदार संदीप कुलकर्णी, शिवसेना जिल्हाप्रमुख बाबूराव कदम कोहळीकर, विवेक देशमुख आदींनी तळणी, निवळा, कोळी, उंचेगाव, शिबदरा, मनाठा, केदारगुडा, उमरी (दर्या़), ल्याहरी, डोरली, तळेगावला भेट देवून पाहणी केली. तामसा मंडळातील कोंडूर, चिकाळा, नाव्हा, ठाकरवाडी, तळणी, उंचेगाव, मरडगा, कोळी, मारतळा, वरुला, आमगव्हाण, वाकी, मनाठा, सावरगाव, वरवट, गायतोंड, जगापुरात पिकांचे मोठे नुकसान झाले.१२०० हेक्टर पिकांचे नुकसानलक्ष्मण तुरेराव।लोकमत न्यूज नेटवर्कधर्माबाद: तालुक्यात सोमवारी रात्री वादळीवारे, पाऊस, गारपिटीने झोडपल्याने हरभरा, ज्वारी, भाजीपाल्याचे झाले असून हजार ते बाराशे हेक्टर पिकांचे नुकसान झाले. पाटोदा(खु), पाटोदा (थडी), चोंडी, रोशनगाव, शेळगाव, माष्टी, बाभळी(ध), मोकली, रत्नाळी, बाळापूर, रामेश्वर, रामपूर, सिरसखोड, आतकूर, मंगनाळी, बेल्लूर (खु) आदी गावांना वादळी वारा, पाऊस आणि गारांचा तडाखा बसल्याने पाचशे ते सहाशे हेक्टर ज्वारी, तीनशे ते चारशे हेक्टर गारपिटीने हरभ-याचे गाठी फुटून चुराडा झाला. भाजीपाला व टरबूज आंब्याचा मोहोर, गव्हाचेही नुकसान झाले. कारेगाव, आटाळा, करखेली, बाचेगाव, पांगरी परिसरात गारपीट झाली नाही.तोंडाला आलेला घास हिरावून घेतल्याचे शेतकरी देवराव पाटील नरवाडे, मारोती पाटील जाधव यांनी तर अवकाळी पावसाने शेतकºयांवर संकट ओढवल्याचे जी.पी. मिसाळे, शिवाजी पाटील, माधव पाटील चोंडीकर, शंकर पाटील, विनोद पाटील, शंकर पाटील, संजय पा. शेळगावकर, पिराजी पाटील, साईनाथ पाटील, दिगंबर पाटील, बंडू पाटील आदींनी सांगितले. नायब तहसीलदार सय्यद उमर, तलाठी नारायण गाजेवार व कर्मचारी नुकसानीची प्राथमिक पाहणी करीत आहेत. उद्यापासून पंचनामे करणार असल्याचे तहसीलदार ज्योती चव्हाण यांनी सांगितले.प्रदीपकुमार कांबळे।लोकमत न्यूज नेटवर्कमंगळवारी दुपारी अनेक गावे व परिसरात गारपीट होवून रबीसह फळबागांचे नुकसान झाले़ आडगाव, पांगरी, बोरगाव, पेनूरसह इतर गावांना गारपिटीचा फटका बसला. गहू, ज्वारी आडवी पडली तर हरभ-याचेही नुकसान झाले़ वादळी वाºयाने आंब्याचे मोठे नुकसान झाले. गारपिटीमुळे टोमाटो, वांगी, मिरचीसह फळे, भाजेपाल्याचेही मोठे नुकसान झाले़ तसेच अनेक झाडे उन्मळून पडली़ पत्रे उडाले. बहुतांश गावांतील वीज गुल झाली़रात्री ८.३० च्या दरम्यान पेनूर, अंतेश्वर, भारसवाडा परिसरात गारपीट झाली. मागील तीन दिवसात तालुक्यात वीज पडल्याने तीन जनावरे दगावली.

तीन हजार हेक्टर क्षेत्र झाले बाधितगोकुळ भवरे।लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : जवळपास तीन हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यात सुमारे ९५ गावांतील ८ कोटी ५ लाख १९ हजार रुपयांचे नुकसान झाले. सारखणी, दहेली, बोथ, पळशी, कनकी, मिनकी, टेंभीरायपूर, लिंगी, बोधडी, भुलजा, शनिवारपेठ, कमठाला, आंदबोरी, येंदापेंदा, दहेगाव, खैरगुडा, मलकवाडी, चिखली बु, उनकेश्वर आदी गावांना फटका बसला. यात ८ जनावरे दगावली. गव्हाचे १ हजार ५१, ज्वारी ५६८ हेक्टर, मका २११ हेक्टर, हरभरा १ हजार ५६१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले. सहा. जिल्हाधिकारी अजित कुंभार,तहसीलदार नरेंद्र देशमुख, कृषी अधिकारी कायेंदे यांनी विविध गावांना भेटी दिल्या.कंधार तालुक्यास गारपीट, पावसाचा फटकागंगाधर तोगरे।लोकमत न्यूज नेटवर्ककंधार : कंधार तालुक्याला सलग दोन दिवसांपासून अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून काढले आहे. यात रबी हंगामातील सर्वच पिकांना याचा फटका बसला.यावर्षी हरभरा सर्वाधिक ११७५ हेक्टरवर पेरण्यात आला. गहू ४१५ हेक्टर, चारापाणी २२१ हे., करडई ५० हेक्टर आदी २४६६ हेक्टरवर रबी लागवड करण्यात आली, मात्र वादळी पाऊस व गारपिटीने खरीप हंगामाची कसर निघत नसली तरी थोडासा आर्थिक हातभार लागतो. तालुक्यातील काटकळंबा, बारुळ, गऊळ, पानशेवडी, कुरुळा, हाडोळी (ब्र.), हिप्परगा, उम्रज, बोळका, हटक्याळ, कंधार, बहाद्दरपुरा, नेहरुनगर, वहाद, महालिंगी, बाभूळगाव, गंगनबीड आदींसह विविध गावांतील पिकांना याचा फटका बसला. काटकळंबा येथे रघुनाथ चोंडे यांची दीड एकर टोमॅटोची बाग आडवी झाली. शिवाजी चोंडे यांचे एक एकरवरील भेंडी-दोडकाही आडवे झाले.बारुळ मंडळातंर्गत उपविभागीय अधिकारी प्रभोदय मुळे, जि.प.सदस्य प्रवीण पाटील, मंडळाधिकारी मेथे, तलाठी मारोती कदम, सरोदे यांनी तर गऊळ, पानशेवडीतील पिकांची पाहणी अरुणा संगेवार यांनी केली. यावेळी माणिक पानपट्टे, तुकाराम बसवदे, शिवाजी चोंडे, गुडाराम तेलंग, साईनाथ कोळगिरे, मोहन पवार, गोविंद वाकोरे, हणमंतराव पानपट्टे, नवाद सय्यद आदींनी नुकसानीची व्यथा मांडली.बिलोली तालुक्यात नऊ गावांना फटकाराजेश गंगमवार।लोकमत न्यूज नेटवर्कबिलोली : सोमवारी रात्री सव्वाआठच्या दरम्यान झालेल्या अर्धा तासाच्या वादळीवारे व गारपीटचा फटका नऊ गावांना बसल्याचे प्रशासनाच्या पाहणीत पुढे आले.महाशिवरात्रीची सार्वजनिक सुटी असतानाही बिलोली महसूल प्रशासनाने मंगळवारी दिवसभर विविध गावांची पाहणी केली़ रबी हंगामातील गहू, ज्वारी, हरभरा पाठोपाठ तंबाखू तसेच भाजीपाला पिकाचे नुकसान झाले़तालुक्यात सोमवारी रात्री गुजरी, कोळगाव, कांगठी, खपराळा, तोरणा, हरनाळा, कुंभारगाव, कांगठी, डौर अशा ९ गावांत गारपिटीचा तडाखा बसला़ जवळपास २५ ते ३० मिनिटे असे भयावह वातावरण होते, असे त्या गावातील शेतकºयांनी सांगितले़मंगळवारी बिलोलीचे उपविभागीय अधिकारी निवृत्ती गायकवाड, तहसीलदार विनोद गुंडमवार, नायब तहसीलदार संजय नागमवाड यांनी मंडळ अधिकारी व गावच्या तलाठींना घेऊन नुकसानीचा आढावा घेतला़नुकसानग्रस्त शेतकºयांना धीर दिला़ यावेळी विक्रम साबणे, विश्वनाथ समन, बाबाराव रोकडे, शंभर मावलगे, व्यंकट गुजरवाड आदी उपस्थित होते़