मुखेड तालुक्यात ४ लाख ७६ हजार ५०० रुपायाचा गुटका जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:34 IST2021-02-21T04:34:20+5:302021-02-21T04:34:20+5:30
जांब बु येथे मोठ्या प्रमाणात गुटका विक्री होत असल्याची गुप्त माहिती मुखेड पोलीस प्रशासनाला मिळाली. नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय ...

मुखेड तालुक्यात ४ लाख ७६ हजार ५०० रुपायाचा गुटका जप्त
जांब बु येथे मोठ्या प्रमाणात गुटका विक्री होत असल्याची गुप्त माहिती मुखेड पोलीस प्रशासनाला मिळाली. नव्यानेच रूजू झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन सांगळे व पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांनी पदभार घेताच अवैद्य धंद्या विरोधात धाडी सञ सुरु केले. जांब येथे अवैद्य गुटका असल्याची कुणकुण पोलिसांना लागली. पोलीस स्टेशनचे पथक जांब बु येथील पंडित राऊतवाड यांच्या कॉम्प्लेक्स मध्ये असलेल्या यश अंडा सेंन्टर व कंन्फेशनरी दुकानात अवैधरित्या शासनने प्रतिबंधित केलेल्या गुटका पान मसाला सुगंधी तंबाखू मिश्र सुपारी साठवणूक करून विक्री करत आहेत, अशी माहिती मिळताच पोलिसाने त्या दुकानावर अचानक धाड टाकली. या ठिकाणी गुटकाची पोते आढळून आली. सदरील मुद्देमाल चा पंचनामा केला असता ४ लाख ७६ हजार ५०० रु चा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक विलास गोबाडे, उपनिरीक्षक गाजनना काळे,पोलिस उपनिरीक्षक अनिता इटुबोने, पोलीस अमलदार प्रदीप शिंदे, सिद्धार्थ वाघमारे, बळीराम सूर्यवंशी यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. पोलीस उपनिरीक्षक अनिता इटुबोने यांच्या फिर्यादीवरून आरोपी सद्दाम ,
संजय पंडित राऊतवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
मुखेड तालुक्यातील जांब बु हे गाव सीमावर्ती भगत असून चार तालुके जळकोट, कंधार, अहमदपूर ,मुखेड, उदगीर हे समान अंतरावर आहेत. या भागात अवैध व्यवसाय बोकाळले असल्याची तक्रारी नेहमीच ऐकिवात असून बंदी असलेल्या गुटखा चा एवढ्या मोठ्या प्रमाणावर आढळून आलेल्या अवैध साठा ने नागरिक चक्रवून गेले आहेत.