शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

उघड्या डीपीने घेतला सालगड्याचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 00:53 IST

तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल करुन नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्देहदगाव तालुक्यातील बरडशेवाळाची घटनाबरडशेवाळा प्रा.आ. केंद्रात उत्तरीय तपासणीची सोय नाही

हदगाव : तालुक्यातील बरडशेवाळा येथील उघड्या डीपीचा धक्का बसून सालगड्याचा मृत्यू झाल्याची घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. घटनेनंतर मयताच्या कुंटुबियाप्रति सहानुभूती दाखविण्याऐवजी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ‘मयत फ्यूज टाकण्यासाठी का गेला?’ असा उफराटा सवाल करुन नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिल्याने तणाव वाढला. दरम्यान, पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर नातेवाईकांनी मयतावर अंत्यसंस्कार केले.मयत राम विठ्ठलअप्पा रणखांब (वय ३७) हे हनुमान नाईक यांच्या शेतात सालगडी म्हणून कामाला होते. १९ मार्च रोजी रात्री शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी उठले, मात्र त्यावेळी शेतातील वीज गेली असल्याने ते डीपीकडे गेले. डीपीतील फ्यूज टाकत असताना विजेचा तीव्र धक्का बसून त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २० मार्च रोजी सकाळी उघडकीस आली. ही घटना समजताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून महावितरणच्या कारभाराविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयताच्या कुटुंबियांना सहानुभूती दाखविणे तर दूर राहिले, ते डीपीकडे कशाला गेले? फ्यूज टाकण्यासाठी कोणाची परवानगी घेतली? असे उफराटे सवाल महावितरणच्या संबंधितांनी केल्याने नातेवाईक भडकले व त्यांनी राडा करुन प्रेत ताब्यात घेण्यास नकार दिला.घटनेची माहिती मिळताच मनाठा पोलीसही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर बरडशेवाळा येथील प्रा.आ. केंद्रात मयताचे प्रेत उत्तरीय तपासणीसाठी आणण्यात आले. दरम्यान, यावेळी उपस्थित डॉक्टरांनी दुसरा वैद्यकीय अधिकारी नसल्याने सांगून उत्तरीय तपासणी करण्यास नकार दिल्याने नातेवाईक पुन्हा भडकले. तीन ते चार तास प्रेत तसेच पडून होते. नंतर हदगावच्या उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात येवून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. २० मार्च रोजी सायंकाळी मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.महावितरणचे ३३ केव्ही केंद्र बरडशेवाळा येथे आहे़ बरडशेवाळा येथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने शेतातील डीपी, लोंबकळलेल्या वीजतारा, कालबाह्य झालेल्या डीपी यांची दुरुस्ती करण्याचे काम गावातील जाणकार मंडळी आपापल्या परिने करतात़ नादुरुस्त झालेले साहित्य या शेतकºयांना वेळेवर कधीच मिळत नाही़

टॅग्स :NandedनांदेडelectricityवीजDeathमृत्यू