पालकमंत्र्यांनी फिरविली नांदेडकडे पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:54 IST2018-01-05T00:54:34+5:302018-01-05T00:54:39+5:30
भीमा कोरेगाव घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान हदगाव तालुक्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर मात्र नांदेडमध्ये फिरकले नाहीत. विशेष म्हणजे ते गुरुवारी नांदेडमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.

पालकमंत्र्यांनी फिरविली नांदेडकडे पाठ
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : भीमा कोरेगाव घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात वातावरण तणावपूर्ण झाले. या आंदोलनादरम्यान हदगाव तालुक्यात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतरही जिल्ह्याचे पालकमंत्री अर्जुन खोतकर मात्र नांदेडमध्ये फिरकले नाहीत. विशेष म्हणजे ते गुरुवारी नांदेडमध्ये येणार असल्याची माहिती देण्यात आली होती.
संपूर्ण जिल्ह्यात मंगळवार आणि बुधवार हा आंदोलन, धरणे, मोर्चाचा दिवस ठरला. या काळातच अनेक ठिकाणी वाहनांवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांवरही दगडफेक झाली. त्यानंतर पोलिसांचा अतिरेकी बळाचा फटका सामान्य नागरिकांना बसला.
पोलिसांविरुद्ध तीव्र असंतोष बुधवारी सायंकाळी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत उफाळून आला. जिल्ह्यात निर्माण झालेली परिस्थिती हताळण्यात प्रशासन विशेषत: पोलीस अधीक्षक अपयशी ठरल्याचा आरोपही करण्यात आला. या सर्व घडामोडीनंतरही पालकमंत्री खोतकर यांनी मात्र नांदेडकडे पाठ फिरविली. नांदेड महापालिका आणि किनवट नगरपालिका निकालामध्ये शिवसेनेचा सफाया झाल्यापासून ते केवळ नियोजन समितीच्या बैठकीसाठी नांदेडमध्ये आले होते.