फुलवळ परिसरात बाबासाहेबांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:16 IST2021-04-15T04:16:58+5:302021-04-15T04:16:58+5:30
फुलवळ : फुलवळसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे ...

फुलवळ परिसरात बाबासाहेबांना अभिवादन
फुलवळ : फुलवळसह परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय येथे सरपंच विमलबाई मंगनाळे, उपसरपंच तुळशीराम रासवंते, माजी सरपंच बालाजी देवकांबळे, ग्रा.पं. सदस्य प्रवीण मंगनाळे, चंदबस मंगनाळे, विमलबाई देवकांबळे, गंगाधर शेळगावे, केदार देवकांबळे उपस्थित होते. जि. प. कें. प्रा. शाळा येथे शा.व्य.स. अध्यक्ष नागनाथ बोधणे, नवनाथ बनसोडे, प्रकाश बसवंते, मुख्याध्यापक बालाजी केंद्रे, के व्ही. मंगनाळे, इब्राहीम पठाण, हिराकांंत मंगनाळे उपस्थित होते. श्री बसवेश्वर विद्यालय येथे मुख्याध्यापक बापूराव मंगनाळे, नामवाडे, फुलवळकर, निलेवाड, करेवाड, पांचाळ आदी उपस्थित होते. पशुवैद्यकीय दवाखाना येथे परिचारक गुट्टे, देवकांबळे, आंबुलगा येथील माणिक प्रभू विद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मनोहर पाटील, मुख्याध्यापक एस. एम. गिरे, बी. एम. आकुलवाड, कंधारेवाडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच किशनबाई गीते, उपसरपंच शंकर डिगोळे, ग्रा.पं. सदस्य उद्धव पुरी, ग्रामसेवक एम. एस. टेंभुर्णे, राजू कंधारे तसेच जि. प. प्रा. शाळा सोमसवाडी येथे मुख्याध्यापक डी. एन. मंगनाळे, ग्रा.पं. आंबुलगा येथे ग्रामसेवक एस. व्ही. निलेवाड, मुंडेवाडी येथे सरपंच ज्ञानोबा मुंडे, ग्रामसेवक गुद्दे व अन्य उपस्थित होते.
शेंबोलीत आंबेडकर जयंती साजरी
बारड : शेंबोली जि. प. प्रा. शाळेत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला मुख्याध्यापक एल. डी. शिंदे, शिक्षक चंपत मुनेश्वर, गोरेवाड, सुधाकर कांबळे, गोविंद गोरेवाड आदी उपस्थित होते.
राहेर ग्रामपंचायतीत अभिवादन
आरळी : नायगाव तालुक्यातील राहेर ग्रामपंचायतीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. कार्यक्रमाला ग्रामविकास अधिकारी माणिकराव जाधव, सदस्य उत्तम इंगळे, चंद्रकांत दुधणे, अरविंद हिवराळे, माजी सरपंच सुनील डुमणे, शैलेश डुमणे, ज्ञानेश्वर झोळगे आदी उपस्थित होते.
तोरणा येथे अभिवादन
आरळी : बिलोली तालुक्यातील मौजे तोरणा येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच मारोती वाघमारे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन केले. यावेळी सखाराम नरवाडे, हणमंत हिवराळे, लक्ष्मण बोरगावे, मालोजी वाघमारे, गौतम सोनकांबळे, देवराव नरवाडे आदी उपस्थित होते.
बिलोलीत बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण
बिलोली : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण १४ एप्रिल रोजी करण्यात आले. यानिमित्ताने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला.
यापूर्वी पुतळ्याअभावी तहसील कार्यालयाजवळ जयंती साजरी होत होती. तथापि माजी नगराध्यक्ष मैथिली कुलकर्णी यांनी नगर परिषदेशेजारी जागा निश्चित करून पुतळा बांधकामाचा ठराव घेतला. माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी रिपब्लिकन पार्टीचे बापूसाहेब गजभारे, जि. प. सदस्य दशरथ लोहबंदे, नगराध्यक्ष मारोती पटाईत, माजी नगराध्यक्ष भीमराव जेठे, नगरसेवक प्रकाश पोवाडे आदींनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गटनेते नागनाथ तुमोड, नगरसेवक प्रकाश पोवाडे, जावेद कुरेशी, शाहेद बेग इनामदार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक पी. आय. गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते उत्तम जेठे, अल्पसंख्याकचे फेरोज खान, इंद्रजीत तुडमे, वलीयोद्दीन फारुखी, अमजद चाऊस, डॉ. दीपक जाधव, नितीन देशमुख, राजेंद्र कांबळे, मुन्ना पोवाडे, शिवा गायकवाड, किरण लघुळकर, संदीप कटारे आदी उपस्थित होते. यावेळी बिलोली ऑटो युनियनचे गौतम जाधव, आकाश जाधव, विकास भालेराव, कीर्तीराज शृंगारे यांनी उपस्थितांना लाडू वाटप केले.
सावळी येथे जयंती साजरी
आरळी : बिलोली तालुक्यातील मौजे सावळी येथे ग्रामपंचायतीच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. सरपंच प्रतिनिधी प्रकाशराव माकूरवार यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच एखार शेख, पिंटू आरोटे, साहेबराव साेनकांबळे, युसुफ शेख, राजेश पाटील, शंकरराव कुरे, माधव मंचलवाड, शंकरराव काळे, मारोती बदनापुरे, हणमंत देवकर आदी उपस्थित होते.
बाबासाहेबांची जयंती साजरी
बामणी-फाटा : मौजे पळसा, ता. हदगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाली. कार्यक्रमाला सरपंच शिल्पा कांबळे, कोंडबा दवणे, विलास मस्के, टी. जी. घंगाळे, गजानन मस्के, विकास कांबळे, कामाजी निमडगे, ज्ञानेश्वर हराळे, शंकर मस्के, शंकर कदम, प्रभाकर भालेराव, रामराव मस्के, सिंधुबाई वालगोटेवार, काशीराव मस्के, शिवाजी मस्के, देवीदास होलगोले, प्रकाश गंगासागर, चंपती घंगाळे, बालाजी भिसे, संजय भिसे, सोपान हापगुंडे, बालाजी निलेवार, शांताबाई कांबळे, गणपत घंगाळे, बाबूराव जगताप, दत्तात्रय नरवाडे, रणजीत कांबळे, शंकर मुळे उपस्थित होते.