बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना आता अधिनियमातील शक्तीचे पाठबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:19 IST2021-02-24T04:19:40+5:302021-02-24T04:19:40+5:30
या आदेशात म्हटले आहे की, सर्व नागरिक, आई-वडील, पालक, प्रिंटिंग प्रेस, पुरोहित (सर्व धर्मिय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, ...

बालविवाह रोखण्यासाठी ग्रामसेवकांना आता अधिनियमातील शक्तीचे पाठबळ
या आदेशात म्हटले आहे की, सर्व नागरिक, आई-वडील, पालक, प्रिंटिंग प्रेस, पुरोहित (सर्व धर्मिय), फोटोग्राफर, आचारी, मंडप डेकोरेशन, केटरर्स, व्यवस्थापक, मंगल कार्यालये तसेच लग्न कार्याशी जे कोणी संबंधित व्यावसायिक जर बालविवाहाला चालना देताना, त्यांच्यासाठी सहकार्य करताना, लग्नाचे विधी करताना आढळतील अथवा या कार्यास प्रतिबंध करण्यात हलगर्जीपणाने कसूर करतील, त्यांना दोन वर्षे एवढ्या कालावधीचा सश्रम कारावास शिक्षा व एक लाख रुपयांपर्यंत दंडाच्या शिक्षा होऊ शकते. याचबरोबर अशा बालविवाहास उपस्थित राहणाऱ्या व्यक्ती किंवा यात सहभागी होणाऱ्या व्यक्तिंचाही यात समावेश आहे.
विवाह करणाऱ्या व्यक्ती यात कायद्यानुसार सज्ञान म्हणजेच मुलाचे वय २१ व मुलीचे वय १८ असल्याची खातरजमा करुनच विवाह संबंधित कामे करावीत. शिवाय यासंबंधीची माहिती फलक दर्शनी भागावर डकविण्याबाबतही आदेशात सांगितले आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या अधिनियमाच्या कारवाईबाबत तसे स्पष्ट आदेश मंडप डेकोरेशन व्यवस्थापक, सर्व आचारी - केटरर्स, सर्व प्रिंटिंग प्रेस, सर्व पुरोहित, सर्व छायाचित्रकार, सर्व मंगल कार्यालयांचे व्यवस्थापक यांच्या नावे काढले आहेत.