शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Grampanchayat Result: चुरशीच्या लढतीत माहूरात महाविकास आघाडीची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 18:17 IST

भगवती, बंजारातांडा, शेकापूर या ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध होते.

माहूर (नांदेड) : माहूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचा निकाल आज जाहीर झाला. यात राष्ट्रवादी कॉंग्रेस- १०, शिवसेना उद्धव ठाकरे- ७, भाजप -१, गोर सेना- १, सचिन नाईक मित्रमंडळ २, अपक्ष ४ असे पक्षीय बलाबल असल्याचा दावा नेत्यांनी केला आहे. 

दरम्यान, २६ ग्रामपंचायती पैकी भगवती, बंजारातांडा, शेकापूर या ग्रामपंचायतीत सरपंच बिनविरोध होते. वसराम नाईक तांडा ग्रा,प. निवडणूकीवर बहिष्कार तर हिंगणी ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदासाठी  नामनिर्देशन पत्र न दाखल झाल्याने उर्वरित २२  ग्रा.प. साठी निवडणूक झाली.  या टप्प्यातील लक्षवेधी असलेल्या वानोळा ग्रामपंचायतमध्ये अभिजित राठोड यांच्या पॅनलने तर लखमापूर  ग्रामपंचायत मध्ये गणेश राठोड, लांजी ग्रामपंचायतमध्ये  मारोती रेकुलवार  यांच्या पॅनलने सरपंच पदासह सदस्य पदावर  संपूर्ण पॅनल निवडून आणले. 

या मतमोजणी दरम्यान मालवाडा ग्रा.प. च्या प्रभाग क्र. एक चे मतदान यंत्र तांत्रिक अडचण आल्याने सुमारे एक तास मतमोजणीस विलंब झाला.आज झालेल्या मतमोजणी मध्ये पाचोंदा-  विलास तानबा तोरकड, महादापूर-प्रतिभा सुभाष आडे, पवनाळा- प्रविका इंदल राठोड,मालवाडा-  सुनीता लक्ष्मण  बेहरे,पानोळा-रमेश बाबुलाल कुडमेथे , गुंडवळ-   रामेश्वर किशन जाधव,  इवळेश्वर-वंदना दूधराम राठोड, पडसा- रुखमाबाई माधव आरके,  बंजारातांडा - दुर्गाबाई जयवंत उर्वते (बिनविरोध), मछीद्रापार्डी- जयश्री प्रकाश वाढवे, दिगडी (कु ) -बाळू सुखदेव तिळेवाड, मांडवा -सीमाबाई गणेश राठोड   दत्तमंजारी - सुलोचना अर्जुन पवार, वायफनी -गोकर्णा  सुरेश अंकुरवार, भोरड -जनार्धन हुसेन धुर्वे, कुपटी -प्रफूल बंडू  भुसारे, रुई - लता गणेश  राऊत, भगवती रुक्मिबाई नागोराव मडावी( बिनविरोध),  लांजी मारोती बंडू  रेकुलवार, बोरवाडी - अंजली  गजानन राठोड,  शेकापूर सीमा राजू धबडगांवकर ( बिनविरोध), शे. फ. वझरा- दीपक संभाजी केंद्रे,वानोळा- सुनीता देवराव सिडाम,तांदळा - दुर्गा संतोष जाधव,लखमापूर - गणेश दतरराम राठोड  हे सरपंचदावर निवडून आले.                 निवडणूक आयोगा तर्फे मतमोजणीसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. ६  टेबल वर १४ फेऱ्यामध्ये मतमोजणी घेण्यात आली. मतमोजणी स.१०:०० वा सुरु होऊन ३:३० वा. पूर्ण करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार किशोर यादव यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार राजकुमार राठोड यांनी उत्कृष्ट नियोजन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी  विजय डोंगरे  यांच्या मार्गदर्शनात माहूरचे पोलीस निरीक्षक नामदेव रिठे,  अण्णासाहेब पवार, संजय पवार गोपनीय शाखेचे खामनकर, गजानन इंगळे, यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणतेही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतNandedनांदेड