ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:32+5:302020-12-30T04:23:32+5:30

येथे तीन वार्ड असून नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. मराठा, मुस्लिम, मातंग, बौध्द, वडार, कोळी, गवंडी, परीट ...

Gram Panchayat election campaign begins | ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळणी सुरू

ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळणी सुरू

येथे तीन वार्ड असून नऊ सदस्य असलेली ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. मराठा, मुस्लिम, मातंग, बौध्द, वडार, कोळी, गवंडी, परीट , लिंगायत समाजातील लोक येथे आहेत. मराठा समाजाचे येथे वर्चस्व असले तरी गेल्या चाळीस वर्षांत मागासवर्गीय व्यक्तीचीच ग्रामपंचायतवर एक हाती सत्ता होती. त्या कालावधीत म्हणाव तेव्हढा विकास साधता आला नाही. रस्ते, पाणी, वीज आरोग्य व रोजगार या समस्या आजही भेडसावत आहेत.

येथील ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याची परंपरा आहे. गेल्या चाळीस वर्षांत फक्त एक बार येथे निवडणूक झाली या निवडणुकीत मात्र बिनविरोध निवडणूक होणार नाही असेच चित्र दिसून येत आहे. जो तो दंड थोपटून निवडणुकीत उभे टाकण्याच्या तयारीत आहे. सरपंच पदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर सुटणार आहे. सरपंच कोणीही होवो मात्र सामान्य नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, रोजगार व आरोग्य या मुलभूत सुविधांची गरज आहे. येथील सांडपाणी मुख्य रस्त्यावर गेल्या अनेक दिवसापासून तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. भावी सरपंचास घाण पापाण्याची विल्हेवाट लावणे हे एक मोठे आव्हान ठरणार आहे.

Web Title: Gram Panchayat election campaign begins