गोविंदनगरात घरफोडी, रोख ६० हजार पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:18 IST2021-04-04T04:18:17+5:302021-04-04T04:18:17+5:30

शहरातील गोविंदनगर येथील रमेश राठोड हे घराला कुलूप लावून २६ मार्च रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप ...

In Govindnagar, burglary, 60,000 cash was stolen | गोविंदनगरात घरफोडी, रोख ६० हजार पळविले

गोविंदनगरात घरफोडी, रोख ६० हजार पळविले

शहरातील गोविंदनगर येथील रमेश राठोड हे घराला कुलूप लावून २६ मार्च रोजी बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरात डाळीच्या कोटीमध्ये ठेवलेले रोख ६० हजार रुपये, प्लॉटची रजिस्ट्री व सोन्याच्या दागिन्यांची पावती चोरून नेली. राठोड हे २ एप्रिल रोजी सकाळी बाहेर गावाहून घरी आले असता चोरीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी राठोड यांनी विमानतळ ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक वाघमारे हे करीत आहेत.

१० हजारांची देशी दारू जप्त

नांदेड : लॉकडाऊन दरम्यान दारू विक्रीस बंदी असताना अवैध दारू विक्री करण्यासाठी साठा केलेली १० हजार रुपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथे पेट्रोल पंपासमोर एम.एच.२६-बीएस ७१५७ क्रमांकाच्या दुचाकीवरून अवैध दारुची वाहतूक सुरू होती. पोलिसांनी ही दुचाकी तसेच १० हजार रुपयांची देशी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी पोहेकॉ मोहन कनकवळे यांनी तक्रार दिली. या तक्रारीवरून मरखेल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ सिद्धेश्वर करीत आहेत.

Web Title: In Govindnagar, burglary, 60,000 cash was stolen