राज्यपाल दोन दिवस नांदेडमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 00:07 IST2018-02-11T00:06:53+5:302018-02-11T00:07:31+5:30
राज्यपाल सी. विद्यासागर राव हे रविवारी दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौºयावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहेत.

राज्यपाल दोन दिवस नांदेडमध्ये
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : राज्यपाल सी. विद्यासागर राव हे रविवारी दोन दिवसांच्या नांदेड जिल्हा दौºयावर येत असून त्यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात विविध कार्यक्रम होत आहेत.
११ फेब्रुवारी रोजी मुंबई येथून विमानाने सकाळी १०.१५ वाजता नांदेड विमानतळ येथे आगमन. त्यानंतर सकाळी ११.१० वाजता दत्तक घेतलेल्या जवरला येथे ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १२.२५ वा. हेलिकॉप्टरने जवरला येथून नांदेड विमानतळाकडे ते प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी अडीच वाजता स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास त्यांची उपस्थिती राहणार आहे. यावेळी त्यांच्या हस्ते इनडोअर स्टेडिअमचे उद्घाटनही होणार आहे. दीक्षांत सोहळा पार पडल्यानंतर ते सायंकाळच्या सुमारास शासकीय विश्रामगृहावर मुक्कामी असणार आहेत. १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.३० वाजता शासकीय विश्रामगृह नांदेड येथून त्यांचे मोटारीने विमानतळाकडे प्रयाण. सकाळी ९.५० वाजता नांदेड विमानतळ येथून खाजगी हेलिकॉप्टरने बायपास रोड रागूडू गाव सीरसीला तेलंगणाकडे ते प्रयाण करतील. त्यानंतर दुपारी २ वाजता सीरसीला (तेलगंणा) येथून खाजगी हेलिकॉप्टरने सगरोळी हेलिपॅड (ता. बिलोली) येथे त्यांचे आगमन होणार आहे. तेथे दुपारी २.२० ते ३.२० वाजेपर्यंत संस्कृती संवर्धन मंडळ शारदानगर सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्र प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर सगरोळीहून ते नांदेडला येणार असून त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास ते मुंबईकडे प्रयाण करणार आहेत.