शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

दहावी, बारावीचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 14:28 IST

सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाचे ४ मे रोजी आदेश 

ठळक मुद्देउत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल

- सुनील जोशी 

नांदेड : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) तथा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी लावण्याच्या हालचाली जोरात सुरू झाल्या आहेत. परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीच्या कामासाठी नियुक्त अधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व अन्य कर्मचाऱ्यांना संचारबंदी शिथिल करण्यात यावी, असे आदेश सर्व जिल्हाधिकारी तथा मनपा आयुक्तांना शासनाने ४ मे रोजी दिले आहेत. 

यंदा बारावीची परीक्षा १८ मार्च रोजी संपली. दहावीचीपरीक्षा २३ मार्चला संपणार होती. परंतु २३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन घोषित करण्यात आला. पुढे त्यात आणखी वाढ झाल्याने बोर्डाने दहावीचा शेवटचा भूगोलचा पेपरही रद्द केला. सरकारने ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविला. या दरम्यान कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता १७ मे पर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला.  लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल कधी लागतो? याकडे सर्वांचे लक्ष होते. कारण, उत्तरपत्रिकांच्या वाहतुकीसाठी अडचण निर्माण होत होती. जवळपास ८० टक्के बारावीच्या उत्तरपत्रिका तर दहावीच्या ७० टक्के  उत्तरपत्रिका बोर्डात पोहोचल्या होत्या. उर्वरित उत्तरपत्रिका परीक्षकाकडेच पडल्या आहेत. परीक्षक तपासून मॉडरेटरकडे सादर करतो. लॉकडाऊनमुळे त्या मॉडरेटरकडे पोहोचल्याच नाहीत. पुढे बोर्डातही गेल्या नाहीत. त्यामुळे निकाल रखडतो की काय? अशी शक्यता निर्माण झाली होती.

नियमानुसार दहावी व बारावीचा परीक्षेचा निकाल १० जूनपूर्वी घोषित करणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी ४ मे रोजी सर्व जिल्हाधिकारी व मनपा आयुक्तांच्या नावे आदेश काढून उपरोक्तप्रमाणे सूचना दिल्या                    आहेत. यासाठी काही अटी व शर्थी लागू करुन सूट देण्यात यावी किंवा प्रवासाकरिता परवानगी/पास देण्यात यावा, असे नमूद केले आहे. 

कामाचे स्वरूप : १) उत्तरपत्रिका परीक्षा केंद्रावरुन किंवा माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांकडे पाठविणे. २) शिक्षक अथवा शिपायामार्फत उत्तरपत्रिका शाळेतून परीक्षकांच्या घरी घेऊन जाणे. ३) परीक्षकाकडून मॉडरेटरकडे उत्तरपत्रिका पोहोचविणे. ४) मॉडरेटरकडील उत्तरपत्रिका संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करणे. ५) परीक्षेतील गैरमार्गप्रकरणी चौकशी करण्यासाठी शिक्षण मंडळाच्या नियुक्त अधिकाऱ्यांनी प्रवास करणे

अटी व शर्तीप्रवास करताना संबंधितांनी त्या कामासाठी मंडळाने दिलेले लेखी आदेश व स्वत:चे ओळखपत्र जवळ बाळगणे व संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास त्यांना दाखविणे वर नमूद कामासाठी अधिनस्त असलेल्या नऊ मंडळातील अधिकारी, कर्मचारी व शिक्षकांना प्रवास करता येईल. च्त्यासाठी खाजगी/ सार्वजनिक वाहन वापरता येईल. अथवा वाहतुकीसाठी मंडळाच्या मान्य ठेकेदाराकडील वाहने भाडेतत्त्वावर वापरता येईल. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराकडून मिळालेले ओळखपत्र जवळ बाळगणे आवश्यक राहील. तसेच ठेकेदाराकडून अशा कर्मचाऱ्यांची स्वाक्षरीत यादी संबंधित कार्यालयाने प्रमाणित करुन घेणे बंधनकारक राहील. 

टॅग्स :examपरीक्षाStudentविद्यार्थीssc examदहावीHSC / 12th Exam12वी परीक्षा