शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारने घेतले झोपेचे सोंग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष : अशोक चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 14:59 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नाही

नांदेड : राज्यात सरकार झोपेचे सोंग घेत असून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नसल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी नांदेडमध्ये केली़ 

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर गुरुवारी जिल्हाभरात धरणे आंदोलन करण्यात आले़ नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयापुढे झालेल्या धरणे आंदोलनात  माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण हेही सहभागी झाले होते़ यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे सरकारने पुर्णत: दुर्लक्ष केल्याची टीका त्यांनी केली़ पीक विम्याची रक्कम अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्यापही मिळाली नाही़ पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांनी रांगा लावून कोट्यवधींची रक्कम भरली आहे़ प्रत्यक्षात शेतकऱ्यांना भरलेल्या रकमेपेक्षाही अत्यल्प विमा मिळाला आहे़ पीक विम्यात कंपन्यांना मोठा नफा झाला आहे़ विमा कंपन्यांकडे शेतकऱ्यांनी प्रिमियमपोटी ५८ कोटी रुपये भरले़ प्रत्यक्षात विम्याच्या रकमेपोटी केवळ १८ टक्के रक्कम मिळाली आहे़ 

कर्जमाफी फसवी याकडे सरकारने लक्ष देवून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळवून देणे गरजेचे आहे़ खरीप हंगाम सुरू होवून महिना उलटला तरी पीक कर्ज अद्याप वाटप झाले नाही़ शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काही देणेघेणे नाही अशीच परिस्थिती आहे. सरकारने घोषित केलेली कर्जमाफी ही फसवी असल्याचे स्पष्ट झाले आहे़ दोन वर्षापूर्वी घोषित केलेल्या कर्जमाफीचा छदामही शेतकऱ्यांना मिळाला नसल्याचे चव्हाण म्हणाले़ 

या आंदोलनात माजी राज्यमंत्री आ़ डी़पी़सावंत, आ़अमरनाथ राजूरकर, महापौर दीक्षा धबाले, मनपा सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी महापौर अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती फारूखअली खान, अमित तेहरा, विलास धबाले, किशोर स्वामी, जि़प़च्या समाज कल्याण सभापती शिला निखाते, अनुजा तेहरा आदींची उपस्थिती होती़

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणFarmerशेतकरीState Governmentराज्य सरकारNandedनांदेडagitationआंदोलन