भाजपच्या उभारणीत गोपीनाथराव मुंडे यांचे अतुलनीय योगदान - देवेंद्र फडणवीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:15 IST2021-06-04T04:15:04+5:302021-06-04T04:15:04+5:30
फडणवीस काल नांदेड दौऱ्यावर आले होते. गुरुवारी सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ...

भाजपच्या उभारणीत गोपीनाथराव मुंडे यांचे अतुलनीय योगदान - देवेंद्र फडणवीस
फडणवीस काल नांदेड दौऱ्यावर आले होते. गुरुवारी सकाळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालयात स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या वेळी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्यासह आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, महानगर अध्यक्ष प्रवीण साले, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर, संदीप पाटील चिखलीकर, भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष प्रणिताताई देवरे चिखलीकर, सचिन चिखलीकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य संतुकराव हंबर्डे, ॲड. शिवाजीराव जाधव, वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. अजित गोपछडे, डॉ. सचिन उमरेकर भाऊराव देशमुख, गंगाधरराव जोशी, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, दिलीप ठाकूर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.