क्रिकेटपटूंसाठी खुशखबर ! रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2021 12:15 PM2021-02-02T12:15:54+5:302021-02-02T12:18:00+5:30

Ashok Chvhan क्रिकेटपटू धवल कुलकर्णी व पराग दहिवल यांनी सोमवारी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन नांदेडमध्ये अकादमी उभारणीसंदर्भात चर्चा केली.

Good news for cricketers! Rohit Sharma and Dhawal Kulkarni to set up cricket academy in Nanded | क्रिकेटपटूंसाठी खुशखबर ! रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी

क्रिकेटपटूंसाठी खुशखबर ! रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये उभारणार क्रिकेट अकादमी

googlenewsNext

नांदेड : क्रिकेटपटू रोहित शर्मा व धवल कुलकर्णी नांदेडमध्ये क्रिकेट अकादमी सुरू करण्यास इच्छुक आहेत. यासंदर्भात कुलकर्णी यांनी सोमवारी सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन यासंदर्भात विचारविनिमय केला.

सोमवारी सायंकाळी मुंबई येथे झालेल्या या भेटीत धवल कुलकर्णी व ‘क्रिककिंगडम’चे पराग दहिवल यांनी या संकल्पनेवर चव्हाण यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. नांदेडमध्ये अनेक प्रतिभावान खेळाडू असून, ही अकादमी सुरू झाल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीचे दर्जेदार प्रशिक्षण मिळेल, अशी अपेक्षा चव्हाण यांनी व्यक्त केली. कुलकर्णी यांनी यावेळी अकादमीसंदर्भात विस्तृत माहिती दिली व नांदेड शहरात उपलब्ध असलेल्या सुविधांची माहिती घेतली. या अकादमीच्या उभारणीची चर्चा करण्यासाठी पुढील बैठक लवकरच होणार आहे.

क्रिकेटपटू धवल कुलकर्णी व पराग दहिवल यांनी सोमवारी बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेऊन नांदेडमध्ये अकादमी उभारणीसंदर्भात चर्चा केली. या भेटीची आठवण म्हणून अशोक चव्हाण यांना टी-शर्ट भेट दिले.
 

Web Title: Good news for cricketers! Rohit Sharma and Dhawal Kulkarni to set up cricket academy in Nanded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.