शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

हळद उत्पादकांना अच्छे दिन; भाव साडेआठरा हजार पार

By रामेश्वर बालाजीराव काकडे | Updated: April 25, 2024 19:02 IST

हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे.

नांदेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डामध्ये नव्या हळदीची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून, दरदिवशी दोन हजारांवर कट्टे हळद विक्रीसाठी येत आहेत. सदर हळदीला नांदेडमध्ये या वर्षातील सर्वोच्च १८ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाल्याने हळद उत्पादकांना आले आहेत.

हळद काढणीला सुरुवात झालेली असून, यावर्षी पाडव्याच्या मुहूर्तापूर्वीच हळद विक्रीसाठी बाजारात आणली आहे. अनेक शेतकऱ्यांनी लवकर लागवड केल्यामुळे काढणी लवकर होऊन थेट विक्रीसाठी मोंढ्यात आणली. तर बहुतांश भागात हळदीची काढणी सुरू आहे. आतापर्यंत आलेल्या हळदीचा उतारा समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगताहेत, पण काही शेतकऱ्यांच्या हळदीवर करपा आल्याने अशा शेतकऱ्यांना उत्पादनात फटका बसला आहे. सोमवारी झालेल्या लिलाव बाजारात हळदीला जास्तीत जास्त १८ हजार ७०० रुपये तर किमान १५ हजार तर सरासरी १६९०० रुपयांचा प्रतिक्विंटल भाव मिळाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीचे दर कमी अधिक प्रमाणात होत असले तरी यंदा हळदीचे उत्पादन घटल्याने येत्या काही दिवसांत भाव वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पंधरा दिवसांपासून दरात वाढमार्च महिन्यात नांदेड मार्केट यार्डात हळदीचे भाव १५ हजार रुपयांपर्यंत होते. पण, त्यानंतर गेल्या पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात वाढ होताना दिसत आहे. सध्या हळदीला सरासरी १७ हजारांपर्यंत भाव मिळत आहे.

सोयाबीनच्या दरात मोठी घसरणएकीकडे दिवसेंदिवस हळदीचे भाव वाढत असले तरी सोयाबीनच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. पाच हजार रुपयांपेक्षा अधिक असलेले सोयाबीनचे भाव प्रतिक्विंटलला ४२०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. सोयाबीनला जास्तीत जास्त ४४८५ तर कमीत कमी ४२०० रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

तुरीने घेतली उच्चांकीतुरीचे भाव नऊ हजारांपर्यंत खाली आले होते. पण, मागील काही दिवसांत तुरीला सर्वोच्च १०५०० रुपये प्रतिक्विटंल भाव मिळाला आहे. तुरीला सरासरी ९८५० रुपये भाव मिळत आहे.

टॅग्स :NandedनांदेडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी