शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणे म्हणजे जिवाशी खेळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 11:52 IST

जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे पुढे आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी धोकादायक इमारतीत शिक्षणाचे धडे गिरवीत असल्याचे पुढे आले आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये जिल्ह्यातील २६७ शाळांमधील तब्बल ५७५ वर्गखोल्यांची अवस्था दयनीय असून १३९ शाळांमधील २७० वर्गखोल्यांची दुरूस्ती करण्याची आवश्यकता आहे.खासगी शाळांचे प्रस्थ वाढले असले तरीही, अद्यापही शहराबरोबरच ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्येच शिक्षण घेत आहेत. या शाळांना पूरेशा पायाभूत सुविधा मिळाव्यात, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून जिल्हा परिषदेला कोट्यवधी रूपयांचा निधीही मिळतो. या निधीतून वर्गखोल्यांच्या बांधकामांसह खोल्यांची दुरूस्ती होणे अपेक्षित आहे. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील अनेक शाळांची अवस्था दयनिय असल्याचेच या स्ट्रक्चरल आॅडिटचा अहवाल सांगतो.जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातर्फे केलेल्या आॅडिटमध्ये ५७४ वर्गखोल्या पाडाव्या लागणार आहेत. यात देगलूर तालुक्यातील सर्वाधिक ८४ वर्गखोल्यांचा समावेश आहे. मुखेड तालुक्यातील ६३, उमरी- २०, नायगाव- ३४, मुदखेड - १४, माहूर - ४४, लोहा- २७, किनवट - ४, कंधार - ४६, हिमायतनगर - १५, हदगाव - ४७, धर्माबाद - ३५, बिलोली - ३२, भोकर - ३४, अर्धापूर - २९ तर नांदेड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांच्या ४६ वर्गखोल्या पाडण्याची आवश्यकता या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे.दरम्यान, या वर्गखोल्यांची सुधारणा करण्यासाठी सर्वशिक्षा अभियानाचा निधीवरच जिल्हा परिषदेची मदार आहे.स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये वर्गखोल्यांची दुरवस्था उघड४ हदगाव तालुक्यातील शाळांच्या दुरूस्तीची आवश्यकता जि.प. बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये २७० वर्गखोल्यांची दुरूस्ती होणे आवश्यक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामध्ये हदगाव तालुक्यातील सर्वाधिक १११ वर्गखोल्या तर कंधार आणि किनवट तालुक्यातील प्रत्येकी ६०, भोकर १७, बिलोली- १३, देगलूर - ५, हिमायतनगर - ३१, मुखेड - ९, माहूर - ७, नांदेड, धर्माबाद प्रत्येकी चार, मुदखेड- २, नायगाव - ३ तर उमरी आणि लोहा तालुक्यातील एका वर्गखोलीची दुरूस्ती होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Nanded zpनांदेड जिल्हा परिषदSchoolशाळाeducationशैक्षणिकEducation Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थीzp schoolजिल्हा परिषद शाळा