शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

गोदावरी महामहोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 12:55 AM

परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़

ठळक मुद्देसमितीसह प्रशासनाची तयारी : मंगळवारी मानकरी दिंड्यांची गळाभेट

नांदेड : परंपरागत गोदावरी महामहोत्सवास ३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत मानकरी दिंड्यांचा गळाभेट हा मुख्य सोहळा मंगळवार, ५ फेब्रुवारी रोजी होणार आहे़ या महामहोत्सवाच्या तयारीच्या अनुषंगाने विविध मठ, संस्थांची शिखर समिती असलेली गोदावरी महामहोत्सव समिती आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे़ दरम्यान, विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे़गोदावरी महामहोत्सवानिमित्त ३ ते ६ फेब्रुवारी या कलावधीत विविध सांस्कृतिक, धार्मिक, जलप्रदूषण, कृषी यांत्रिकीकरण, कोरडवाहू आंतरपीक फळबाग मॉडेल, नदीजोड, रेल्वे विकास, कृषी उद्योग, टेक्सटाईल पार्क, कौशल्य विकास, दुप्पट कृषी उत्पन्न, फार्मर प्रोड्युसर कंपनी, भाषा बोली लिपी उत्सव आदी विषयांवर शहरात ठिकठिकाणी कार्यक्रम, चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे़ पौष अमावास्या काळात हा महामहोत्सव साजरा करण्यात येतो़ सोमवती पौष अमावास्या ४ फेब्रुवारी रोजी उत्तररात्री २ वाजेनंतर सुरू होवून सायंकाळी ७ वाजेपर्यंत आहे़ स्नानासाठी हा पवित्र काळ आहे़ त्यामुळे ३ फेब्रुवारी रोजी शहराच्या चोहोबाजूने तुकाराम महाराज येळेगावकर दिंडी, भानुदास महाराज दिंडी, नंदी महाराज दिंडी वाकळेवाडी दिंडी तसेच सोनखेड, चुडावा, निळा, वसमत, म्हैसा आदी ठिकाणांहून दिंड्या, जथ्थे, भाविक हजारोंच्या संख्येने दाखल होतील़महामहोत्सवात ५ फेब्रुवारी रोजी संत दासगणू नावघाटावर मानकरी दिंड्या ह़भ़प़ भागवत महाराज व हभप हरिमहाराज यांचे दर्गासराय येथे स्वागत गळाभेट दर्गाप्रमुख अंगारे शाह करतील़ सकाळी ६ वाजता संत लिंगूअप्पा साळी व अंबाजी हकीम, कल्याणराव समाधी, गंगागोदावरी देवीपूजन होईल़ भाषाभगिनी संगम मराठी, उर्दू, हिंदी, सिंधी, तेलगू, कन्नड, गुजराती बोली भाषा वर्षानिमित्त गोन्डी गोर बंजारा, मारवाडी, कैकाडी, वडारी भाषिक मान्यवर मार्गदर्शन करतील़दिलीप चव्हाण : मराठी भाषा संकटातभाषा बोली लिपी ज्ञान तंत्रज्ञान विज्ञानाची राहिली नाही तर ती बोलीभाषा होवून नष्ट होते़ जगात दर आठवड्याला चार भाषा नष्ट होतात़ मराठी भाषा नष्ट होण्याच्या मार्गावर असून वेळीच मराठी भाषा वाचविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुल व भाषा बोली व लिपी अध्यासन संशोधन केंद्राचे संचालक डॉ़ दिलीप चव्हाण यांनी केले़ गोदावरी महामहोत्सव समिती आयोजित ‘भाषा बोली व लिपी विकासात प्रकाशक मुद्रक, पत्रकार, साहित्यिक, नाट्य, निबंध, इतिहास, ललितलेखक, वाचनालयाचे योगदान’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते़ यावेळी प्रा़डॉ़जगदीश कदम, प्रा़डॉ़भगवान अंजनीकर, प्रा़डॉ़पुष्पा कोकीळ, पंजाब देशमुख, देवदत्त साने, संजय हाटकर, रामकिशन साखरे यांची प्रमुख उपस्थिती होती़ डॉ़दिलीप चव्हाण म्हणाले, कोणतीही भाषा नष्ट होण्यास राजकीय, आर्थिक उपयोगिता धोरण कारणीभूत ठरते़ आयरिस भाषा नष्ट झाली़ परंतु, न्यूझीलंडने आदिवासी मावरी भाषा वाचविल्याचे चव्हाण म्हणाले़ दरम्यान, निर्मलकुमार सूर्यवंशी यांचा ‘भाषारत्न’ पुरस्कार देवून गौरव करण्यात आला़जिल्हा प्रशासनाला समितीचे साकडेगोदावरी महामहोत्सवानिमित्त नांदेडात येणाऱ्या विविध दिंड्या, भाविकांची गैरसोय होवू नये म्हणून जिल्हा प्रशासनाने विविध सोयीसुविधा पुरवाव्यात, अशी मागणी गोदावरी महामहोत्सव समितीच्या वतीने करण्यात आली आहे़ येणाºया भक्तांसाठी पिण्याचे पाणी, स्नानासाठी प्रत्येक घाटावर कुंडनिर्मिती करावी, वीज, स्वच्छता आदी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे़ यासंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत़

टॅग्स :Nandedनांदेडgodavariगोदावरी