नोकरीची गॅरंटी नसल्याने छोकरीची निवड लांबणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:19 IST2021-07-27T04:19:30+5:302021-07-27T04:19:30+5:30
सात महिन्यात १३८ नोंदणी विवाह कोरोना काळात नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा असताना त्यात घट झाली आहे. मागील ...

नोकरीची गॅरंटी नसल्याने छोकरीची निवड लांबणीवर
सात महिन्यात १३८ नोंदणी विवाह
कोरोना काळात नोंदणी विवाहाचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा असताना त्यात घट झाली आहे.
मागील सात महिन्याच्या कालावधीत केवळ १३८ जणांनी नोंदणी विवाह करून आपले संसार थाटले आहेत.
तरुणांच्या प्रतिक्रिया
कोरोनामुळे कंपनीने घरून काम करण्यास सांगितले. त्यात पगारातही कपात केली. त्यात महागाईदेखील वाढली असून अशा परिस्थितीत एकट्याचा खर्च भागविणे कठीण झाले आहे. त्यामुळे उगाचच लग्न करून खर्चात वाढ करून घेण्यापेक्षा सध्या बॅचलर लाईफच बरे आहे. - विलास भिसे, तरुण
यंदा लग्न करण्याचा विचार होता. शासनाच्यावतीने मुुंबई पालिकेतील विविध पदासाठी घेण्यात आलेल्या भरती नोकरीही लागली होती. परंतु, कोरोनामुळे अद्यापपर्यंत रुजू करून घेतले नाही. त्यामुळे लग्नही लांबणीवर टाकले. - संग्राम पाटील, तरुण
नेहमीपेक्षा कोरोना काळात नोंदणी विवाहांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा होती. परंतु, विवाह नोंदणी कमी झाली आहे. त्यातही शहरी भागातील सुशिक्षित वर्गच अधिक दिसतो. - एन. बी.पतलेवाड, विवाह नोंदणी अधिकारी.