शहरं
Join us  
Trending Stories
1
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
2
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
3
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
4
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
5
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
6
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
7
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
8
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
9
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
10
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
11
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
12
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
13
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
14
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
15
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
16
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
17
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
18
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
19
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
20
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव

गावरान कैरी दुर्मिळ; ‘तिरुपती’वर मदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 12:37 AM

तालुक्यातील प्रसिद्ध गावरान आंबे नानाविध कारणाने दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय आंब्यावर रसाळी करण्याचा प्रसंग ओढवला.

ठळक मुद्देकंधार तालुका; तिरुपती कैरीवर लोणच्याची चाखणार चव प्रतिकिलो ४० रुपये भाव

कंधार : तालुक्यातील प्रसिद्ध गावरान आंबे नानाविध कारणाने दुर्मिळ झाले आहेत. त्यामुळे परप्रांतीय आंब्यावर रसाळी करण्याचा प्रसंग ओढवला. आता खास लोणचे घालण्याचा हंगाम आहे. परंतु तिरूपती कैरीवर लोणच्याची चव चाखण्याची वेळ आली असल्याचे चित्र समोर आले आहे.तालुक्यातील बाचोटी, गोगदरी, फुलवळ, कुरूळा, गऊळ, फकिरदरावाडी, बारूळ, धर्मापुरी, मानसपुरी, शेकापूर, पानभोसी, चिंचोली, आंबुलगा आदी गावे, वाडी-तांड्यांवरील गावरान आंबे रसाळी व लोणच्याकरिता प्रसिद्ध होते. आपल्या खास रसाळ व गोड आस्वादाने या आंब्याला राज्यासह परप्रांतात मोठी मागणी असायची. अक्षय तृतीयाला पिकलेले आंबे रसाळीसाठी बाजारात दाखल होत असत. अशा वेळी खरेदीसाठी केवळ गावच्या नावावर झुंबड उडायची.गत काही वर्षांपासून तालुक्यात सतत दुष्काळ पडत आहे. तापमान कमालीचे वाढत आहे. त्यामुळे एक हजारापेक्षा अधिक आंब्याचे वृक्ष वाळून गेले. त्यातच शिल्लक वृक्षाला आलेला मोहर हा कमाल तापमानाने करपला. पुन्हा अवकाळी पाऊस, वादळीवाऱ्याने कैरी झडून गेल्या. याचा परिणाम म्हणून गावरान आंबे दुर्मिळ झाले. बाजारात मोजके आंबे दाखल झाले. परंतु, आंध्र प्रदेश व कर्नाटक आंब्याचा बोलबाला राहिला. ऐंशी ते शंभर रुपये प्रतिकिलोने कलमी, रूमाली, नीलम, दसेरी, बदाम, केशर आदी पिकलेल्या आंब्याने बाजारपेठ काबीज केली आणि गावरान आंब्याची चव चाखणे दुरापास्त झाले. त्यातच लोणच्यासाठी तिरूपती आंबा बाजारात दाखल झाला. प्रतिकिलो ४० रुपयेप्रमाणे खरेदी करून लोणचे घालण्यासाठी शेतकरी, व्यापारी, नोकरदार सरसावला आहे.किलोत ६ ते ७ कैºया बसतातकिलोत नाममात्र ६ ते ७ कैºया आकाराप्रमाणे बसतात. शहरी व ग्रामीण भागात आठ ते दहा महिने आहारात उपयोगात आणणारा व भोजनाची रंगत वाढवणारे लोणचे प्रसिद्ध आहे.कैरीची फोड करून धुवून घेऊन सुकविले जाते. मीठ, मिरची, हळद, मोहरी, गरम मसाला, लसूण आदींचे योग्य प्रमाणात मिश्रण करून विशिष्ट पद्धतीने गरम तेल थंड झाल्यावर त्यात हे सर्व मिसळून लोणचे घातले जाते. त्यामुळे लोणचे दीर्घकाळ टिकते. म्हणून गावरान कैरी लोणचे प्रसिद्ध आहे.

गावरान कैरी खरेदी करून विक्री करण्याचा हा हंगामी व्यवसाय केला जातो. आता कैरी तशी दुर्मिळ झाल्याने परराज्यातील कैरी आणून विक्री करावी लागत आहे. चॉंद बागवान, समद बागवान, खय्युम बागवान आदी जण यात आहेत. कमाई कमी व ओढाताण जास्त असा प्रकार होत आहे. परवडत नसले तरी पूर्वीपासून हा व्यवसाय करत असल्याने आजही तो आम्ही स्वखुशीने करतो़-शेख अतिख (विक्रेते, कंधार)

टॅग्स :NandedनांदेडMangoआंबाfruitsफळे