शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

दीड मिनिट सादरीकरण अन् १० मिनिटांत गुंडाळला शो; गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 14:33 IST

गौतमी पाटीलच्या या कार्यक्रमाला महिला प्रेक्षकांसह प्रचंड गर्दी झाली होती.

Gautami Patil: सबसे कातील गौतमी पाटील हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम जिथे असेल, तिथे प्रचंड गर्दी पाहायला मिळते. गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला महिलांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात असते. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि गोंधळ हे जणू समीकरणच झाले आहे. असेच एक प्रकरण समोर आले आहे. गौतमी पाटील स्टेजवर आली. दीड मिनिटांचे सादरीकरणही झाले. मात्र, अचानक कार्यक्रम गुंडाळावा लागला.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेडमधील धर्माबाद येथे प्रसिद्ध डान्सर गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाच आयोजन करण्यात आले होते. गौतमीच्या कार्यक्रमासाठी स्टेज बांधण्यात आले होते. प्रेक्षकांची तुडूंब गर्दी झाली होती. सुरक्षेसाठी पोलीसही तैनात करण्यात आले होते. महिलांची गर्दीही लक्षणीय होती. संपूर्ण मैदान तुडूंब भरलेले होते. स्टेजसमोर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. 

गौतमीने प्रेक्षकांशी थोडा संवाद साधला अन् कार्यक्रम सुरु झाला

गौतमी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता स्टेजवर आली. तिने प्रेक्षकांशी थोडा संवाद साधला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. गौतमीने तुम्हा बघून तोल माझा गेला… या पहिल्याच गाण्यावर सादरीकरण सुरू केले. गौतमीचा डान्स आणि तिच्या अदा पाहून प्रेक्षकांमधून टाळ्या शिट्ट्या सुरू झाल्या. प्रेक्षकांनी जागेवर उभं राहून डान्स करत जोरजोरात गोंगाट सुरू केला. काही जणांनी हुल्लडबाजी सुरू केली. गोंधळी प्रेक्षकांना आवरण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर सौम्य लाठीमारही केला. यानंतर प्रेक्षक अधिकच चवताळले. अधिकच गोंधळ सुरू झाला. काही प्रेक्षकांनी मैदानातच खुर्च्यांची मोडतोड सुरू केली. मैदानात पळापळ सुरू झाली. तर काही प्रेक्षकांनी बॅरिकेड्स तोडून स्टेजजवळ गर्दी केली. 

दरम्यान, हा गोंधळ पाहून गौतमीने प्रेक्षकांना शांत राहण्याचे आवाहन केले. पण गोधळ थांबत नसल्याने गौतमीने दहा मिनिटात कार्यक्रम बंद केला. फक्त दीड मिनिटे सादरीकरण करून निघून गेली. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला.

 

टॅग्स :Gautami Patilगौतमी पाटीलNandedनांदेडNandedनांदेडCelebrityसेलिब्रिटी