शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
3
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
4
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
5
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
6
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
7
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
8
पोटात ७ टूथब्रश अन् २ लोखंडी पाने! रिपोर्ट पाहून डॉक्टरही चक्रावले; जयपूरमध्ये तरुणावर थरारक शस्त्रक्रिया
9
साप्ताहिक राशीभविष्य: २०२६ची सुरुवात दमदार, नोकरी-गुंतवणुकीत लाभ; नफा-फायदा, भरघोस भरभराट!
10
'सैराट'मधील इंटिमेट सीनबद्दल पहिल्यांदाच बोलली रिंकू राजगुरू, म्हणाली- "मी घाबरले होते, पण..."
11
आ. विजयकुमार देशमुख यांचा असंतोष ३० तासात मावळला; मुंबईच्या बैठकीत उमेदवार निश्चित
12
Video: "पापाराझींना वाटलं सलमान खान कारमध्ये, पण...", चक्क ई-बाईकवरुन घेतली भाईजानने एन्ट्री
13
मुंबईत भाजप, शिंदेसेनेचे २०७ जागांवर एकमत, २० जागांचा तिढा; ठाण्यात १२ जागांवरून अडले घोडे; आज तोडगा शक्य
14
चांदी एका आठवड्यात ३२ हजारांनी महागली; तर सोन्याची ५७०० रुपयांची झेप; पाहा आजचे नवे दर
15
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २८ डिसेंबर २०२५: आनंदाचा दिवस; शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल!
16
प्रेमात वेडा होऊन पाकिस्तानात पोहोचला! तुरुंगवास भोगून आता अलीगडचा 'बादल बाबू' पुन्हा भारतात येणार!
17
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे? कोण मेले कोणासाठी..?
18
धुक्याचा विळखा अन् प्रवाशांचा खोळंबा! इंडिगोच्या ५७ फ्लाईट्स रद्द; DGCA कडून 'फॉग पिरियड' जाहीर
19
ये क्या था भाई? 'कमली कमली' गाण्यावर सुनिधी चौहानचा विचित्र डान्स, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
Daily Top 2Weekly Top 5

लोकहो जरा होशियार... येत आहेत ढोल-ताशांचे राजकुमार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2022 20:10 IST

प्राथमिक शाळेचे शिक्षक गौरव शिंदे यांच्या नेतृत्त्वात तयार होत असलेल्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाची सुरुवात नोव्हेंबर २०२२ पासून झाली आहे.

प्रवीण खापरे

नागपूर - ढोल-ताशा हे महाराष्ट्राचे पारंपारिक वाद्य आहे आणि या वाद्यांचा केशरी ध्वजासह होणारा नाद शिवशाहीचा आभास घडविणारा ठरतो. हे ढोल-ताशा बडविणारे पथक ही महाराष्ट्राच्या संस्कृतीची श्रीमंती व्यक्त करते आणि युवक-युवतींनी भरलेली, समृद्ध वाद्यजंत्रा असणारी अशी अनेक पथके महाराष्ट्रात आहेत. आता यात भर बालकांच्या पथकाची पडली असून, ढोल-ताशा बडविताना त्यांचा वकूब, तालावर डोलणारी त्यांची देहयष्टी, त्यांच्या चेहऱ्यावर आपसुकच उमटणारी रौद्र छटा आणि आसमंत भेदणारी नादमयी ललकारी... या बालकांना ढोल-ताशांच्या जगतात राजकुमार ठरवितात. विशेष म्हणजे, बालकांचा हा ढोल-ताशा-ध्वज पथक भारतातील एकमेव आहे.

प्राथमिक शाळेचे शिक्षक गौरव शिंदे यांच्या नेतृत्त्वात तयार होत असलेल्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाची सुरुवात नोव्हेंबर २०२२ पासून झाली आहे. पहिली ते चवथी अर्थात ६ ते ९ वर्ष वयोगटातील एकूण ७५ मुले या पथकात सामिल करण्यात आली आहेत. सध्या वाद्यांच्या संख्येच्या अनुपातानुसार ही पथकातील मुलांची संख्या असून, येत्या काळात ही संख्या १५० वादकांपर्यंत नेण्यात येणार आहे. 

विशेष म्हणजे, एका महिन्यापूर्वी सुरू झालेले हे पथक २०२४ मध्ये दिल्ली येथील राजपथावर होणाऱ्या गणराज्य दिनाच्या सोहळ्याची तयारी करत आहेत. राजाबाक्षा येथील नवयुग प्राथमिक शाळेच्या पटांगणात या   पथकाचा सराव दररोज संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर होतो. गांधी टोपी, पांढरा कुर्ता-पायजमा, लाल रंगाचा शेला असा पथकातील मुलांचा तर एकाच रंगातील नववारी पातळ, नाकात नथ, केसांचा अंबाडा आणि गजरा अशी मुलींची वेशभूषा आहे. या पथकाचा सराव सुरू होताच उत्सुकतेपोटी शेजारील परिसरातील लोकांची गर्दी उसळलेली असते. केवळ कुमारवयीन मुलांचा हा पथक ढोल-ताशाच्या क्षेत्रात आपला डंका वाजविण्यास सज्ज झाला आहे.

ओडिशातून आले होते आमंत्रण- आमच्या शिवनवयुग ढोल-ताशा-ध्वज पथकाला ओडीशा राज्यातून वादनासाठी आमंत्रण आले होते. परंतु, महिन्याभरापासूनच सुरू असलेला सराव आणि मुलांचे वय व त्यांची तयारी बघता हे आमंत्रण आम्ही नंतर स्विकारण्याची तयारी दर्शवली. या पथकाला भारतीय शिक्षण मंडळाने सहकार्य केले असून आमच्या शाळेचे मुख्याध्यापक अजय काळे यांच्या प्रोत्साहनाने मुले आणि मुलांमध्ये कुमार वयातच संस्कृती रक्षणाचे धडे देण्याच्या हेतूने या पथकाची सुरुवात झाली आहे.- गौरव शिंदे, शिक्षक आणि पथक प्रमुख 

टॅग्स :nagpurनागपूर