जवान राजेमोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 05:02 IST2018-10-22T05:02:39+5:302018-10-22T05:02:43+5:30

तालुक्यातील पांडुरणा भूमिपुत्र जवान मारोती राजेमोड यांचे बुधवार १७ आॅक्टोबर रोजी जम्मूच्या उधमपूर येथे निधन झाले होते़

Funeral on the death of young Rajhemode | जवान राजेमोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

जवान राजेमोड यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

भोकर : तालुक्यातील पांडुरणा भूमिपुत्र जवान मारोती राजेमोड यांचे बुधवार १७ आॅक्टोबर रोजी जम्मूच्या उधमपूर येथे निधन झाले होते़ रविवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर सशस्त्र सेना, जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाच्या वतीने मानवंदना देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी ‘जवान मारोती राजेमोड अमर रहे’ चा जयघोष करण्यात आला़
जम्मूच्या उधमपूर येथे लष्करातील ८७४ एडी रेजिमेंटमध्ये मारोती कोंडीबा राजेमोड (वय २८) हे जवान म्हणून कार्यरत होते़ कर्तव्यादरम्यान १७ आॅक्टोबर रोजी त्यांचे आकस्मिक निधन झाले होते.
।दिवाळीत येणार होते
परिवार व मित्रांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी २५ आॅक्टोबरला गावी येत असल्याचे मारोती यांनी निधनापूर्वी दोन तास अगोदर मित्र व परिवारास फोन करून सांगितले होते, तर दोन दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्याचेही ते म्हणाले होते़.

Web Title: Funeral on the death of young Rajhemode