शासकीय अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:10+5:302020-12-30T04:23:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हदगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची खोटी कागदपत्रे तयार करून वेतन पटावर खोटी स्वाक्षरी करून ६ लाख २७ ...

Fraud charges filed against government officials | शासकीय अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

शासकीय अधिकाऱ्यांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

हदगाव : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची खोटी कागदपत्रे तयार करून वेतन पटावर खोटी स्वाक्षरी करून ६ लाख २७ हजार ९९९ रुपयांचे बिले उचलून फसवणूक केल्याच्या आरोपाखाली हदगाव न्यायालयाच्या आदेशान्वये पोलिसांनी चार अभियंते व एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

हदगाव येथील ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता जे.डी. सुर्वे, उपकार्यकारी अभियंता यशवंत गच्चे, कार्यकारी अभियंता विश्वनाथ सोनटक्के, लिपिक सय्यद मुमताज अली, अशी गुन्हा दाखल झालेले अभियंते व कर्मचाऱ्यांची नावे आहेत. कार्यालयातील रामराव यादवराव मस्के २००९ मध्ये सेवानिवृत्त झाले होते. त्यांना १० लाख १८ हजार ३५० रुपये पेन्शन मंजूर झाली होती. त्यापैकी ३ लाख ९० हजार ३५१ रुपये प्रत्यक्षात मिळाले. उर्वरित ६ लाख २७ हजार ९९९ रुपये मस्के यांना मिळाले नव्हते. ही रक्कम मिळावी म्हणून त्यांनी उपरोक्त अधिकाऱ्यांकडे वारंवार अर्ज, विनंत्या केल्या. जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन चौकशीची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी चाैकशीचे आदेश दिले. मात्र, चाैकशी समितीने अभिलेखच हस्तांतरण केले नव्हते.

यादरम्यान या अधिकाऱ्यांनी मस्के यांची खोटी कागदपत्रे तयार करून देय रकमेवर वेतन पटावर खोटी स्वाक्षरी करून ६ लाख २७ हजार ९९९ रुपयांची रक्कम उचलून घेतल्याचा आरोप आहे. त्यामुळे मस्के यांना मानसिक धक्का बसून गेल्या १० वर्षांच्या काळात शारीरिक त्रासालाही सामोरे जावे लागले. रक्कम मिळालीच नाही. मात्र, शासकीय निवासस्थान रिकामे करण्याबाबतच्या नोटिसाही त्यांना वरिष्ष्ठांनी दिल्या होत्या. या सर्व त्रासाला कंटाळून मस्के यांनी हदगाव न्यायालयात ॲड. गुरुनाथ हणमते व ॲड. नितीन कागणे यांच्यामार्फत फाैजदारी संहितेच्या कलम १५६ (३) प्रमाणे उपरोक्त अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे प्रकरण दाखल केले. न्या. श्रीमती एस.जी. पांडे-यावलकर यांनी वरीलप्रमाणे आदेश पोलिसांना दिले.

Web Title: Fraud charges filed against government officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.