निम्न मानार प्रकल्पातून आज चौथ्या पाळीचे पाणी सोडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:18 IST2021-05-14T04:18:05+5:302021-05-14T04:18:05+5:30
कंधार तालुक्यातील बारूळ येथे निम्न मानार हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये २३ हजार ३१० हेक्टर ...

निम्न मानार प्रकल्पातून आज चौथ्या पाळीचे पाणी सोडणार
कंधार तालुक्यातील बारूळ येथे निम्न मानार हा जिल्ह्यातील मोठा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रामध्ये २३ हजार ३१० हेक्टर जमीन येते. २०२०-२१ च्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये रब्बी हंगामासाठी ३ व उन्हाळी हंगामासाठी ३ पाणी पाळ्यांना मंजुरी दिली होती. परंतु या दोन्ही हंगामांतील मिळून सहा पाणी आर्वतनादरम्यान पाण्याचा केलेला काटकसरीने वापर यामुळे नियोजित ८४ दलघमी वापरातून ६१.४० दलघमी पाण्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे २२.६० दलघमी पाण्याची बचत झाली.
या बचत झालेल्या पाण्याचा योग्य विनियोग व्हावा व यातून उन्हाळ्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व त्यासोबतच लांबलेला उन्हाळी हंगाम यास फायदा व्हावा यासाठीचा एक प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे सादर केला होता. या प्रस्तावास चव्हाण यांनी मंजुरी दिली असून या मंजुरीनुसार १४ रोजी निम्न मानार धरणातून चौथी पाळी सोडण्यात येणार आहे.