शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अडवून दरोडा टाकणारे चौघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:11 IST

नांदेड रस्त्यावरील सीताखांडी शिवारात सहा दरोडेखोरांनी एका ट्रकला अडवून चालकास धारदार शस्त्राने मारहाण करीत लुटून पोबारा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दोघे फरार झाल्याची थरारक घटना मंगळवारी पहाटे घडली.

भोकर : नांदेड रस्त्यावरील सीताखांडी शिवारात सहा दरोडेखोरांनी एका ट्रकला अडवून चालकास धारदार शस्त्राने मारहाण करीत लुटून पोबारा करणाऱ्या चौघांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले तर दोघे फरार झाल्याची थरारक घटना मंगळवारी पहाटे घडली.दरम्यान, नांदेडहूून येणाºया एका चारचाकी वाहनातील किनवट तालुक्यातील बोधडी येथील प्रवाशांना संशय आल्याने त्यांनी जखमी ट्रकचालकाची चौकशी केली. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्या प्रवाशांनी ट्रकचालकासह भोकर पोलीस ठाणे गाठले. कर्तव्यावर हजर पोहेकॉ सुरेश श्रीमंगले, सुनील कांबळे यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तेव्हा दोन दुचाकीवर दरोडेखोर भोकरकडे येताना दिसून आले.पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग केला. त्यातील एक मोटार- सायकल शहरातील ओम लॉन्स जवळ घसरली. यात दुचाकीस्वार पळाला तर मागे बसलेले दोघे पळ काढीत होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी यातील एका दरोडेखोरास बोरगाव येथून सकाळी ताब्यात घेतले तर चौथ्या दरोडेखोरास नांदेड येथून ताब्यात घेण्यात आले. अन्य दोन दरोडेखोरांचा पोलीस तपास करीत आहेत. अटक करण्यात आलेले दरोडेखोर रामेश्वर बालाजी बल्लोड, गोपीनाथ गोविंदराव शेळके (दोघे रा. बोरगाव नागरी ता. मुदखेड), ज्ञानेश्वर लिंबाजी लेंडगे (रा.कलमुला ता.पूर्णा जि.परभणी), संकेत बालाजी चव्हाण (रा. हनुमानगढ, नांदेड). या चौघांना अटक करुन फरार झालेल्या दरोडेखोरासह ६ जणांविरुद्ध भोकर पोलिसांत दरोड्याचा गुन्हा नोंद करण्यात आला. यातील अटक करण्यात आलेल्या चौघांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २१ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील हे करीत आहेत.

  • फिर्यादी ट्रकचालक पुनया कुटुंबराव मंगलपुडी (रा.जिजुर मंडळ यरुपवाड, ता. नंदीगाव जिल्हा कृष्णा आंध्रप्रदेश) ट्रक (क्र. एपी-३९- यु ५३६९) विशाखापट्टणम येथून भोकरमार्गे गुजरातला आॅईलचे कॅन घेवून जाताना सीताखांडी शिवारात २ मोटारसायकल (क्र, एमएच २६ १५०१ व एमएच २६-४६११) वरुन आलेल्या ६ दरोडेखोरांनी ट्रकला अडवून चालकास तलवार व जांबीयाने मारहाण करुन जखमी करुन त्यांच्याकडील ६ हजार रुपये लुटून पळ काढला.
टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीtheftचोरीNanded policeनांदेड पोलीस