शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

प्रयागराजला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघात; ४ जणांचा मृत्यू, तर १९ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 17:18 IST

मृतांमध्ये नांदेडच्या तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा समावेश

नांदेड- प्रयागराज येथील महाकुंभ मेळ्यावरून अयोध्येकडे निघालेल्या भाविकांच्या टेम्पो ट्रॅव्हलरचा भीषण अपघात झाला. या घटनेत चार भाविकांचा मृत्यू झाला, तर अन्य १९ जण जखमी झाले आहेत. ही घटना उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यात घडली. मयतांमध्ये नांदेड येथील तिघांचा तर हिंगोली जिल्ह्यातील एका महिलेचा समावेश आहे.

नांदेड येथून प्रयागराज येथील कुंभमेळ्यासाठी टेम्पो ट्रॅव्हलरने २३ जण रवाना झाले होते. महाकुंभ मेळ्यात स्नान करून हे सर्व भाविक टेम्पो ट्रॅव्हलरने अयोध्येकडे निघाले होते. दरम्यान, रविवारी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास पूर्वांचल एक्सप्रेस वे वर उभ्या असलेल्या एका ट्रॅव्हल्सवर भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर जावून धडकली. या भीषण अपघातात चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.

यामध्ये नांदेडमधील छत्रपती चौक परिसरात राहणाऱ्या सुनील दिगंबर वरपडे (वय ५०), अनुसया दिगंबर वरपडे (वय ८०), दीपक गणेश गोदले (वय ४०) आणि हिंगोली जिल्ह्यातील आडगाव रंजेबुवा येथील जयश्री पुंडलिकराव चव्हाण (वय ५०) यांचा समावेश आहे. तर जखमी १९ जणांना लखनौ येथील गोसाईगंज येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

टॅग्स :AccidentअपघातNandedनांदेडHingoliहिंगोलीDeathमृत्यूUttar Pradeshउत्तर प्रदेश