शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

चौघे मांडूळ तस्कर नांदेडमध्ये पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 7:56 PM

मांडूळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे़त

ठळक मुद्देसाडे चार लाखांचे तीन मांडूळ जप्त

नांदेड : नांदेड शहरानजीक असलेल्या आसना नदी परिसरातून चार मांडूळ तस्करांना स्थानिक गुन्हे शाखेने पकडले़ या तस्करांकडून साडेचार लाख रुपये किमतीचे तीन मांडूळ जप्त करण्यात आले आहेत़ त्यानंतर हे मांडूळ वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे़त.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि़.द्वारकादास चिखलीकर यांना खबऱ्याकडून मांडूळ तस्कराबाबत माहिती मिळाली होती़ दुपारी साडे बाराच्या सुमारास सपोनि़ मांजरमकर यांच्या पथकाला अर्धापूर हद्दीत आसना नदीशेजारी असलेल्या गुरुद्वाराच्या बाजूस काही जण आढळून आले़ पोलिसांनी लगेच छापा टाकून  भीमराव ऊर्फ संतोष पुजाराम बिºहाडे (२९, रा. कारला, ता़ हिमायतनगर) शेख सलमान शेख आजीम (२४,रा़ टाटीगुडा, आदिलाबाद,)  सय्यद मूसा सय्यद युसूफ (४२,रा़ तेहरानगर, नांदेड)  आणि अजमतखान समंदरखान पठाण (५०, रा़ माजलगाव) या चार जणांना अटक केली. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. त्यांच्याकडून तीन मांडूळ जप्त करण्यात आले़ त्यामध्ये पहिले मांडूळ २ किलो १४० ग्रॅम, दुसरे मांडूळ १ किलो ९३० ग्रॅम आणि तिसरे मांडूळ  ९७० ग्रॅम वजनाचे आढळले.  तिन्ही मांडूळाची बाजारपेठेत किमंत अंदाजे साडे चार लाख रुपये असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला़ 

या मांडूळांना डबल इंजन, डबल मुव्हमेंट या नावाने ओळखले जात असल्याचे आरोपींनी सांगितले़ हे मांडूळ वनविभागाच्या ताब्यात दिले आहेत़ ही कारवाई पोलीस अधीक्षक विजय मगर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनील नाईक, पोउपनि. राठोड, सपोउपनि. चव्हाण, भानूदास वडजे, मारोती तेलंग, दिनानाथ श्ािंदे, दशरथ जांभळीकर, विष्णू इंगळे, तानाजी येळगे, देवा चव्हाण, बजरंग बोडके, विलास कदम, राजू पुलेवार यांनी केली़

टॅग्स :ArrestअटकPoliceपोलिसNandedनांदेड