जिल्ह्यात दुचाकीचोरीच्या चार घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:14 IST2021-05-28T04:14:47+5:302021-05-28T04:14:47+5:30
शहरातील गुरुद्वारा गेट नं. ६ मुरमुरा गल्ली भागात निरव जितेंद्र रावल यांची दुचाकी (एम.एच.२६-ए-झेड ९७९२) चोरट्यांनी शनिवारी ...

जिल्ह्यात दुचाकीचोरीच्या चार घटना
शहरातील गुरुद्वारा गेट नं. ६ मुरमुरा गल्ली भागात निरव जितेंद्र रावल यांची दुचाकी (एम.एच.२६-ए-झेड ९७९२) चोरट्यांनी शनिवारी रात्री लंपास केली. याप्रकरणी रावल यांच्या तक्रारीवरून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
भाग्यनगर ठाण्यांतर्गत दुचाकीचोरीच्या दोन घटना घडल्या आहेत. वामननगर येथून अप्सरखान पठाण सादतखान पठाण यांची दुचाकी (एम.एच.२६- एक्स ६६१८) सोमवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या राहत्या घरासमोरून लंपास केली तर सिद्धिविनायकनगर येथूनही चोरट्यांनी सचिन हनमंतराव गेडेवाड यांची दुचाकी (एम.एच.२६-पी- ६९५५) त्यांच्या घरासमोरून चोरून नेली. या दोन्ही प्रकरणी भाग्यनगर ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. भोकर येथे डी. बी. कॉलेज येथून बलरामसिंह विठ्ठलसिंह रघुवंशी यांची दुचाकी (एम.एच.२६-एएल- ८१२८) चोरट्याने पळवली. रघुवंशी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.