बियाणांसाठी ४२ हजार अर्जातून पावणेसहा हजार शेतकऱ्यांचेच नशीब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:14 IST2021-06-05T04:14:18+5:302021-06-05T04:14:18+5:30
एकूण अर्ज - ४१६४१ निवड - ५८७० अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे. परंतु, अद्यापपर्यंत मॅसेज आलेला ...

बियाणांसाठी ४२ हजार अर्जातून पावणेसहा हजार शेतकऱ्यांचेच नशीब
एकूण अर्ज - ४१६४१
निवड - ५८७०
अनुदानित बियाणे मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला आहे. परंतु, अद्यापपर्यंत मॅसेज आलेला नाही. कृषी विभागाकडे विचारणा केली असताना मॅसेजची वाट पहा, असा सल्ला दिला जात आहे. महागडे बियाणे घेणे परवडत नाही. त्यामुळे शासनाने थेट बांधावर बियाणे उपलब्ध करून द्यावे. - अवधूत कदम, शेतकरी
गतवर्षी महाबिजकडून बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु, पावसाअभावी बियाणे निघाले नाही. त्यात दुबार पेरणी करावी लागल्याने यंदा सोयाबीनचे घरेलू बियाणे पेरण्याचा निर्णय घेतला आहे. काही कंपन्यांनी गावात येऊन पेरणीविषयी जनजागृती केली आहे; परंतु, कृषी विभागानेही तशी जनजागृती करणे अपेक्षित आहे.
- नारायण जोगदंड, पिंपरी.
शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, योग्य प्रमाणात पाऊस होण्याची वाट पाहावी. जमिनीत योग्य प्रमाणात ओल निर्माण झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी तसेच बियाणांची आदळ आपट होणार नाही, याची काळजी घ्यावी. त्याचबरोबर प्रमाणित केलेले बियाणे विकत घेऊन त्या बॅगचे टॅग, बिल आदी जपून ठेवावे.
- आर. बी. चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड.