शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

माहूरात ३० लाखांत खवले मांजर विक्रीचा प्लान वनविभागाने उधळला, पाच तस्कर ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 19:16 IST

खवले मांजर वाचले, तस्कर गजाआड; माहूरात वनविभागाची मध्यरात्री कारवाई

- नितेश बनसोडेमाहूर (जि. नांदेड): तब्बल ३० लाखांत खवले मांजर विक्रीसाठी माहूर शहरात आलेल्या पाच जणांना वनविभागाच्या पथकाने गुप्त कारवाईत ताब्यात घेतले. ही धडक कारवाई मंगळवारी (दि. १८) रात्री उशिरा करण्यात आली. आरोपींकडून एक जिवंत खवले मांजर, एक कार व एक दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

वन्यजीव गुन्हे नियंत्रण विभाग (मुंबई) यांच्या गोपनीय माहितीनुसार नांदेड वनविभागाने सापळा रचला. उपवनसंरक्षक केशव वाभळे व किनवट सहायक वनसंरक्षक किरण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली माहूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी रोहित जाधव व प्रमोद राठोड यांनी डमी ग्राहकाच्या माध्यमातून आरोपींशी संपर्क साधला. नियोजित ठिकाणी कारमधून आरोपी खवले मांजर घेऊन आल्यानंतर पथकाने धाड टाकली आणि सर्वांना जेरबंद केले.

या प्रकरणी रुपेश मारोतराव चेनेकर (रा. वर्धा), बाळू पुंजाराम डोखळे, माधव पुंजाराम डोखळे, आनंद पांडुरंग भालेराव (रा. नांदेड) व जयदीप मारोती राठोड (रा. यवतमाळ) या पाच जणांविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. खवले मांजर हे अधिनियमातील अनुसूची-१ मधील प्राणी असून त्याची तस्करी अथवा शिकार केल्यास तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. वनविभागाने याप्रकरणी कठोर कारवाई करत आरोपींना तुरुंगात डांबले आहे.

या मोहिमेत वनपाल मनोहर कत्तुलवार, मीर साजिद अली, वनरक्षक निशांत दुर्गे, दीपक माने, ज्ञानेश्वर माळेकर, ओम वरकड, माधव डाके, गणेश काळे, अमोल गेडाम, बीजुसिंग गुसिंगे आदींचा मोलाचा सहभाग होता.

“वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. बेकायदेशीर शिकार व व्यापार रोखण्यासाठी विभागाकडून कठोर कारवाई सुरूच राहील.” - केशव वाभळे, उपवनसंरक्षक, नांदेड

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीforestजंगल