शहरं
Join us  
Trending Stories
1
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पुनम महाजनांचे तिकीट कापले
2
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
3
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
4
धडाधड यांचे उमेदवार पाडा, कांद्याकडे वाकड्या नजरेने बघण्याची हिंमत होणार नाही; राजू शेट्टी कडाडले
5
जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला FAKE व्हिडीओ; निवडणूक आयोगाकडून होणार कायदेशीर कारवाई
6
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
7
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
8
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
9
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
10
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
11
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
12
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
13
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
14
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
15
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
16
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!
17
"...मग साताऱ्यात उदयनराजेंच्या विरोधात प्रचार का करताय?", भाजपाचा संजय राऊतांना सवाल
18
TMKOC Sodhi Missing: गुरुचरण सिंग बेपत्ता प्रकरणावर पोलिसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'काही क्लू मिळालेत...'
19
“श्रीकृष्णासारखा नेता आमचे सारथ्य करणार आहे”; शिंदे गटातील नेत्याची PM मोदींवर स्तुतिसुमने
20
बस झालं, हार्दिक पांड्याला पूर्वीसारखं महत्त्व देण्याची गरज नाही; इरफान पठाण संतप्त 

‘आकार’ने ठेवले शिक्षण पद्धतीतील दोषावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 12:47 AM

शंकरराव चव्हाण सभागृहात यतीन माझिरे लिखित, दिग्दर्शित ‘आकार’या नाट्यप्रयोगाने सध्याच्या शिक्षण पद्धतीतील दोषावर थेट बोट ठेवून, उपस्थितांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. आईवडिलांच्या अपेक्षेच्या डोंगराखाली दबलेल्या चिमुकल्यांच्या भावविश्वात डोकावणारे हे नाटक रसिक प्रेक्षकांना खूप काही शिकवून गेले. एखादे मूल नापास होणे ही घराघरांतून चिंतेची बाब झाली आहे. या नापास विद्यार्थ्यांशी त्यांचे आईवडील आणि इतर नातेवाईक, मित्र मैत्रिणींंनी कसे वागावे, हे आकार या नाटकातून दाखविण्यात आले आहे.

ठळक मुद्देराज्य हौशी नाट्यस्पर्धा : पद्धत बदलताच त्याची गणितात वाढली रुची

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : शंकरराव चव्हाण सभागृहात यतीन माझिरे लिखित, दिग्दर्शित ‘आकार’या नाट्यप्रयोगाने सध्याच्या शिक्षण पद्धतीतील दोषावर थेट बोट ठेवून, उपस्थितांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले. आईवडिलांच्या अपेक्षेच्या डोंगराखाली दबलेल्या चिमुकल्यांच्या भावविश्वात डोकावणारे हे नाटक रसिक प्रेक्षकांना खूप काही शिकवून गेले. एखादे मूल नापास होणे ही घराघरांतून चिंतेची बाब झाली आहे. या नापास विद्यार्थ्यांशी त्यांचे आईवडील आणि इतर नातेवाईक, मित्र मैत्रिणींंनी कसे वागावे, हे आकार या नाटकातून दाखविण्यात आले आहे.कोणतीही व्यक्ती हा जगातील अद्वितीय आहे. त्याच्यासारखा कोणी दुसरा राहू शकत नाही. त्याचे त्याला एक वेगळे अस्तित्व असते, विचार असतात, बुद्धिमता असते मग आपण त्यास इतरांसारखे वागावे किंवा व्हावे अशी अपेक्षा का ठेवतोत? एखादा अभ्यासात हुशार नाही तो नेहमी नापास होतो म्हणून तो निर्बुद्ध आहे, गाढव आहे असे का समजतो? या आणि अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधायला भाग पाडणारे नाटक म्हणजे आकार. आपटे कुटुंब हे कोकणातील गणपती बनविणारे. घरातील प्रमुख व्यक्ती अप्पा (सुधन्वा पानसे) हे गणितज्ज्ञ पण त्यांचाच मुलगा वक्रतुंड (अभिजित केळकर) हा गणित या विषयात गेली दोन वर्षांपासून नापास होत आहे. आणि त्यांनी बनविलेला गणपतीही विकला जात नाही. म्हणून अप्पा घरातील सर्व व्यक्तींना त्यास न बोलण्याची सक्त ताकीद देतात. वक्रतुंडचा मोठा भाऊ माधव (यतीन माझिरे) हा त्यास गणित शिकवण्यास सुरवात करतो. पण त्याची गणित शिकविण्याची पद्धत मात्र थोडी वेगळी असते. तो पुस्तक किंवा वही घेवून शिकवत नाही तर तो खेळत, सहज फिरत, रोजच्या वापरातील गोष्टीवरून, बोलण्यातून, गाण्यातून शिकवतो आणि आश्चर्य म्हणजे ते वक्रतुंडास समजते आणि त्याची गणितातली रुची वाढते. त्यामुळे गणित हा विषय घरच्या सर्वच मंडळींसाठी सोपा बनतो.कोणतेही शिक्षण अवघड नाही फक्त ती शिकविण्याची पद्धत बदलली की सर्व सोपे वाटायला लागते हा संदेश यतीन माझिरे यांनी या नाटकातून उत्तमरीत्या दिला. यातील बालकलावंत साहिल वाईकर याचा निरागस अभिनय हे रसिक प्रेक्षकांना भावला. सखी अंबेकर आणि केतकी भालवनकर या बालकलावंतांनीही आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. तर नेहा कुलकर्णी, सिद्धी गुंफेकर, आशुतोष पुरोहित, सुचित्रा गिरीधर, कणाद बेहरे यांनी आशयानुरूप भूमिका साकारण्याचा प्रयत्न केला.आशावाद टिकवायला सांगणारे नाटकमहाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेच्या अंतिम फेरीत शेवटच्या टप्प्यात मंगलमूर्ती कालाबहार, भिरोंडा, सत्वरी, गोव्याच्या वतीने सुविधा तोड्गल लिखित सुशांत नायक दिग्दर्शित ‘अ‍ॅण्ड ए पॉयझन अ‍ॅपल फॉर मी प्लीज’ हे नाटक सादर झाले. एब्सर्ड प्रकारातील हे नाटक, माथी (माधुरी शेटकर) आणि जॉर्ज (वर्धन कामत) हे प्रेमविवाह करून एकत्र आलेले जोडपे. त्यांच्या संसाराची सुरुवात एका टिपिकल नवदाम्पत्यांसारखी, गोड आणि प्रेमळ होते; पण जसा काळ उलटत गेला तसे दोघांमधले संबंध अधिक तणावग्रस्त होत गेले. ओळखीच्या दाम्पत्यांना निका (सौरभ कारखानीस) आणि हानी (ममता पेडणेकर) यांना घरी आमंत्रित करून त्यांच्या मदतीने आयुष्याचा एक एक दिवस मागे टाकून आयुष्यातला आशावाद टिकवून ठेवण्याचा कटू प्रयत्न या नाटकात ठळकपणे दिसून येतो. या नाटकाची प्रकाशयोजना- गोरक्षनाथ राणे, संगीत- श्रीनिवास उसगावकर, नेपथ्य- सौमित्र बखले, वेशभूषा- दीपलक्ष्मी मोघे, रंगभूषा- अक्षदा हळदणकर यांनी साकारली.