व्हॉलीबॉलमध्ये एफ.एम. सय्यद संघ, मुखेड प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:13 IST2020-12-09T04:13:44+5:302020-12-09T04:13:44+5:30

मुखेड : मुखेड येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर ६ डिसेंबर रोजी ...

FM in volleyball Syed Sangh, Mukhed I. | व्हॉलीबॉलमध्ये एफ.एम. सय्यद संघ, मुखेड प्रथम

व्हॉलीबॉलमध्ये एफ.एम. सय्यद संघ, मुखेड प्रथम

मुखेड : मुखेड येथील महात्मा जोतिबा फुले महाविद्यालयाच्या मैदानावर ६ डिसेंबर रोजी हॉलीबॉल क्लब मुखेडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हॉलीबॉल सामन्यात एफ.एम. सय्यद व्हॉलीबॉल संघ, मुखेड, प्रथम तर यशवंत वाढवणा व्हॉलीबॉल संघ द्वितीय, तर उदयगिरी क्लब उदगीरने तृतीय बक्षीस पटकावले.

या स्पर्धेचे उद्‌घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राहुल लोहबंदे, शंकर वड्डेवार, पोलोस निरीक्षक एन.एल. रिठ्ठे, पोलीस उपनिरीक्षक जी.डी. चित्ते, प्रा. बी.टी. पाटील, नारायण होनराव, शिवाजी गेडेवाड, सचिन इंगोले, अंतेश्वर गोगे, सुरेशसिंह चौव्हाण, वीरभद्र लंगेवाड, मनोहर सूर्यवंशी, बाबू गंदपवाड आदी उपस्थित होते. यावेळी एकदिवसीय दिवस-रात्र खेळवल्या गेलेल्या व्हॉलीबॉल सामन्यात १६ संघांनी सहभाग नोंदवला होता.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषक प्रहारचे तालुकाध्यक्ष शंकर वड्डेवार, द्वितीय पारितोषक अ‍ॅड. अंतेश्वर गोगे, तर तृतीय पारितोषक माजी नगरसेवक राहुल लोहबंदे यांच्या वतीने देण्यात आले. या स्पर्धेत पंच म्हणून आर.एफ. पवार, कासीम खान, मनोहर सूर्यवंशी, बाबू गंदपवाड, डी.एन. गायकवाड, प्रा.डॉ. संजय गायकवाड यांनी काम पाहिले, तर स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी हेमंत घाटे, शिवाजी जाधाव, संतोष गुद्दे, पांडुरंग जोशी, ओम मंडले, पवन चव्हाण, अभिजित देठे, सूरज राठोड, अशितोष कांबळे, अतिश गंगणर, रत्नदीप गायकवाड, आनंद बोडके, बालाजी पाटील, संजय गायकवाड, भीम सोनकांबळे, वीरू पुठवाड यांनी परिश्रम घेतले.

Web Title: FM in volleyball Syed Sangh, Mukhed I.