शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
2
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
3
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
4
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
5
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
6
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
7
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
8
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
9
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
10
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
11
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
12
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
13
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
14
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं
15
राहुल गांधी भारतीय नागरिक आहेत की नाही? अहवाल द्या...उच्च न्यायालयाचे केंद्राला निर्देश
16
भयंकर! संपत्तीच्या लोभापायी पती-पत्नीची हत्या; आईनेच स्वतःच्या लेकाला, सुनेला दिले विषारी लाडू
17
भिवंडीत कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ नवजात बाळाचा मृतदेह सापडला, परिसरात खळबळ!
18
Numerology: आयुष्याला कलाटणी देणारा सप्ताह; मुलांकानुसार जाणून घ्या साप्ताहिक भविष्य!
19
गरीब बिचारे! भारत आणि पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या पगारात तब्बल 'इतक्या' कोटींचा फरक
20
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल

इंग्रजीत बोलणे,खाकी वर्दी पण तोतया अधिकारी; MPSC जॉब न मिळाल्याने निवडला चुकीचा मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:13 IST

शासकीय नोकरी मिळण्याच्या सर्व आशा मावळल्याने त्याने तोतया अधिकारी बनण्याची शक्कल लढविली.

नांदेड : उच्च शिक्षणानंतरही शासकीय नोकरी न मिळाल्याने अनोखी शक्कल लढवीत चक्क वन विभागाची खाकी वर्दी घालून गंडविणाऱ्या कपिल गणपतराव पाईकराव या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे. अस्खलित इंग्रजी बोलणारा हा तरुण सॉ-मिलला भेटी देऊन पैसे उकळत होता. मंगळवारी रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणारी लाकडांची वाहने अडविण्यासाठी तो थांबला अन् पोलिसांच्या गळाला लागला.

हदगाव तालुक्यातील निवघा येथील कपिल गणपतराव पाईकराव याचा जन्म ६ डिसेंबर १९९१ ला झाला होता. घरची आर्थिक परिस्थिती जेमतेम. कपिल हा शिक्षणात हुशार होता. त्याने बीसीए अभ्यासक्रमातून पदवी घेतली. मध्यंतरी त्याने काही वर्षे स्पर्धा परीक्षेची तयारीही केली होती; परंतु वारंवार त्याला त्यात अपयश येत होते. शासकीय नोकरी मिळण्याच्या सर्व आशा मावळल्याने त्याने तोतया अधिकारी बनण्याची शक्कल लढविली. त्यासाठी वन विभागाची निवड केली.  वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकांच्या स्वाक्षरीचे बनावट ओळखपत्रही तयार केले, तसेच रेंज अधिकाऱ्याप्रमाणे खाकी वर्दीही शिऊन घेतली. आपल्या दुचाकीवरही त्याने वन विभागाचे फिरते पथक असे स्टिकर लावले होते. त्यामुळे कुणालाही त्याच्यावर संशय येत नव्हता.

किनवट आणि माहूर तालुक्यात सॉ-मिलला भेटी देऊन तो अधिकारी असल्याच्या थाटात तपासणी करायचा. अनेक त्रुटी काढून नंतर तडजोड करून रक्कम उकळायचा. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरू होता. परंतु मंगळवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेला खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून लातूर फाटा ते डेअरी चौक भागातून त्याला ताब्यात घेण्यात आले. सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पाईकराव याने नंतर तोतया अधिकारी असल्याची कबुली पोउपनि दत्तात्रय काळे यांना दिली. या प्रकरणात रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांनी पाईकराव विरोधात गुन्हा नोंदविला आहे. त्याने परिधान केलेली खाकी वर्दीही जप्त करण्यात आली आहे. 

फसवणूक झाल्यास तक्रार करा वन विभागाचा अधिकारी बनून कपिल पाईकराव याने अनेक लाकडी मिल चालकांकडून रक्कम उकळल्याची शक्यता आहे. परंतु, त्याबाबत कुणीही तक्रार केली नाही. कुणाची फसवणूक झाल्यास त्यांनी नांदेड ग्रामीण पोलीस किंवा स्थान्बिक गुन्हे शाखेकडे तक्रार करावी, असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :NandedनांदेडCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग