पाच तरुणांना पोलिस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:15 IST2020-12-26T04:15:14+5:302020-12-26T04:15:14+5:30
कुंटूर : सोयाबीनची चोरी करणार्या दोन आरोपींना नायगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बरबडा येथील व्यापारी व ...

पाच तरुणांना पोलिस कोठडी
कुंटूर : सोयाबीनची चोरी करणार्या दोन आरोपींना नायगाव न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. बरबडा येथील व्यापारी व बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील व मोहन पचलिंग यांच्या गोदामातून सुमारे १ लाख ४२ हजार ८०० रुपयांचे ६८ पोते सोयाबीन आरोपी प्रथमेश पांपटवार, ओम कुर्हाडे, पवन माचनवाड, संभाजी कवळे, तिरुपती उलगुलवार यांन २२ रोजी टेम्पोतून लंपास केले होते. दुसर्या दिवशी ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी तपास करुन पाचही जणांना ताब्यात घेवून न्यायालयात दाखल केले असता, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. सपोिन करीम खा पठाण, उपनिरीक्षक जांभळीकर, बीट जमादार नागोराव पोले, भार्गव सुवर्णकार व विजय अवुलवार यांनी घटनेचा बारकाईने तपास केला. पुढील तपासात अन्य काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता सपोनि पठाण यांनी व्यक्त केली.