जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:18 IST2021-03-23T04:18:55+5:302021-03-23T04:18:55+5:30

घरातील इनव्हर्टर अन् बॅटरी लंपास नांदेड- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे घर फोडून इनव्हर्टर आणि बॅटरी लंपास ...

Five two-wheelers were stolen in the district | जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला

जिल्ह्यात पाच दुचाकी चोरीला

घरातील इनव्हर्टर अन् बॅटरी लंपास

नांदेड- नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत धनेगाव येथे घर फोडून इनव्हर्टर आणि बॅटरी लंपास करण्यात आली. ही घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. प्रकाश जयवंतराव देशमुख हे पत्नीच्या गुडघ्याच्या उपचारासाठी घराला कुलूप लावून रुग्णालयात गेले होते. चोरट्याने मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला होता. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

वजिराबाद हद्दीत दोन ठिकाणी दारू पकडली

नांदेड- वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायंकाळी ५ वाजेनंतर विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी पकडले. २१ मार्च रोजी ही कारवाई करण्यात आली आहे. या दोन्ही ठिकाणाहून पोलिसांनी दहा हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.

दुचाकीसह ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

नांदेड- लातूर रस्त्यावरून दुचाकीवर विनापरवाना दारू घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी पकडले. २१ मार्च रोजी सकाळच्या वेळी ही कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांनी अडीच हजार रुपयाची दारू आणि दुचाकी जप्त केली आहे. या प्रकरणात नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Web Title: Five two-wheelers were stolen in the district