शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

हाळणी, कुपटीत अचानक लागलेल्या आगीत पाच घरे भस्मसात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:11 IST

संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़ 

मुक्रमाबाद (जि़नांदेड) : मुक्रमाबाद येथून जवळच असलेल्या मुखेड तालुक्यातील हाळणी येथे मंगळवारी मध्यरात्री लागलेल्या आगीत चार घरे जळून भस्मसात झाली़ या दुर्घटनेत संसारोपयोगी साहित्य खाक झाल्याने चार कुटुंबे उघड्यावर आली आहेत़ 

हाळणी येथील हणमंत यादवराव नामाजी, प्रकाश यादवराव नामाजी, विलास यादवराव नामाजी आणि पुष्पा नारायण नामाजी या शेतकऱ्यांच्या घरांचेआगीत नुकसान झाले़ गावातील बाळु मामा मंदिर येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. याठिकाणी सुरू असलेल्या कीर्तनासाठी घरातील महिला, पुरुष गेले होते. तर उन्हाळ्यामुळे काहीजण अंगणात झोपले होते. रात्री उशीरा या चार शेतकरी कुंटूबांच्या घरांना अचानक आग लागली. आगीने झपाट्याने रौद्ररुप धारण केल्याने चारही घरे जळून खाक झाली. उदगीर येथील अग्निशामक दलाची गाडी  मागविण्यात आली़ मात्र तोपर्यंत या चारही घरांचे मोठे नुकसान झाले होते़ मुक्रमाबाद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कमलाकर गडीमे, जमादार सुरनर यांनी तसेच तलाठी एम़जी़ जमदाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला़  यावेळी दत्ता पाटील, गोपाळ पाटील, हणमंत मलापुरे, जळबा देवकत्ते, काशीनाथ राठोड उपस्थित होते.

दरम्यान माहूर तालुक्यातील कुपटी  येथे दिलीप चोखाजी कवडे यांच्या राहात्या शेतातील घराला  मंगळवारला दुपारी दोनच्या सुमारात अचानक  लागलेल्या आगीत जवळपास  दोन लाख रुपयांचे नुकसान झाले़ यात स्प्रीकरचे ४० पाईप, बैलगाडी, गहू, ज्वारी, घरातील एलसीडी, फॅन, चना, कांदे, लसुण, घराचे दारे, खिडक्या व शेतातील पूर्ण साहित्य  जळून खाक झाले़  घरामध्ये पूर्ण कुटूंब दुपारच्या वेळेस आराम करात होते. घरातील सिलेंडर, शेगडी पूर्णपणे जळून खाक झाली़ गावातील एका व्यक्तीने  धाडस करुन ते सिलेंडर टाकी घराच्या पत्रावरुन जावून बाहेर काढली़ त्यामुळे मोठी जीवीत हानी टळळी़ घराला आग लागताच गावातील नागरीक धावून आले़ मात्र वाऱ्याचा जोर जास्त असल्याने  आग  विजविण्यास विलंब लागला़ तोपर्यंत घरातील साहित्य जळून खाक  झाले होते़  

आगीत ८७ लाखांचे बगॅस खाकलक्ष्मीनगर येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला आग लागून ८७ लाखाचे नुकसान झाले़  लक्ष्मीनगर देगाव-येळेगाव येथील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना परिसरातील बगॅसला ३० एप्रिल रोजी तापमान वाढलेले असताना दुपारी १़४५ च्या सुमारास अचानक आग लागली़  या आगीमध्ये कारखान्याचे सुमारे सात हजार मे़टन बगॅस जळून खाक झाला़ या आगीमध्ये कारखान्याचे अंदाजे ८७ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कारखाना प्रशासनाने व्यक्त केला आहे़ या घटनेप्रकरणी विनायक कदम यांच्या तक्रारीवरून बारड पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद घेण्यात आली असून पुढील तपास ए.एस.आय.सावंत करीत आहेत.

टॅग्स :fireआगHomeघरNandedनांदेड