शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
4
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
5
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
6
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
7
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
8
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
9
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
10
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
11
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
12
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
13
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
14
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
15
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
16
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
17
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
18
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?
19
पोलिसांनी काठी मारली, दुचाकीवरील महिला तोल जावून डंपरखाली सापडली, जागीच मृत्यू   
20
बीसीसीआयनं केंद्रीय करारातून लॉर्ड शार्दुल ठाकूरचं नाव वगळलं!

राज्यातील पाच जिल्ह्यांना हत्तीरोगाचा धोका; आरोग्य यंत्रणा सक्रिय, कशामुळे होतो हा रोग? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 12:02 IST

प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

नांदेड : राज्यातील पाच जिल्ह्यांमध्ये हत्तीरोगाचा धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे या जिल्ह्यांत हत्तीरोग निर्मूलन राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत नागरिकांना घरोघरी जाऊन प्रतिबंधात्मक औषधींचे वाटप केले जाणार आहे. या मोहीमत ४५ लाख नागरिकांना औषधी वाटप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि नांदेड या ५ जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांना डीईसी, अल्बेंडाझोल आणि इवरमेक्टिन ही तीन औषधी देण्यात येणार आहेत. गोंदिया आणि नांदेड जिल्ह्यात डीईसी आणि अल्बेंडाझोल ही दोन औषधे दिली जातील. प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी बूथवर आणि घरोघरी भेटी देऊन पूर्वनिश्चित डोसनुसार ही औषधे वाटप करणार आहेत. राज्याला हत्तीरोगापासून मुक्त करण्यासाठी प्रभावी आंतरक्षेत्रीय समन्वयाद्वारे सुमारे ४५ लाख ३४ हजार ६५३ व्यक्तींना हत्तीरोग (फायलेरिया) प्रतिबंधक औषधी देण्याचे उद्दिष्ट आरोग्य यंत्रणेकडून निर्धारित केले आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती नागरिकांना औषधी...हत्तीरोगापासून बचावासाठी प्रशिक्षित आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चंद्रपूर- ११ लाख ६१ हजार ४०४, भंडारा- २ लाख ७२ हजार ८३३, गोंदिया- ८ लाख ९६ हजार १५७, नांदेड- १९ लाख ४८ हजार ६१२ आणि गडचिरोली जिल्ह्यातील २ लाख ५५ हजार ६४७ नागरिकांना अँटी-फायलेरियल औषधी देण्यात येणार आहे.

अशी असतील पथकेजिल्हा - पर्यवेक्षक-रॅपीड रिस्पॉन्स टीमचंद्रपूर - १७७ -४५भंडारा- १२८ -५गोंदिया- १२८ -१३४नांदेड- ३८६ -५२गडचिरोली-२०४-११एकूण- १०२४ -२४७

औषधीचा दुष्परिणाम नाही :हत्तीरोग (फायलेरियासिस) प्रतिबंधक औषधी घेतल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. ही औषधी सुरक्षित असून उच्च रक्तदाब, मधुमेह, संधिवातग्रस्त व्यक्तींनी ती घेतली पाहिजे. औषधी घेतल्यानंतर लाभार्थ्याला अडचणी आल्यास, रॅपिड रिस्पॉन्स टीम मदतीसाठी असणार आहे.

कशामुळे होतो हत्तीरोग?क्युलेक्स, मांसोनिया संक्रमित डास चावल्याने फायलेरिया (हत्तीरोग) हा गंभीर आजार होतो. यामध्ये लिम्फॅटिक सिस्टमला हानी पोहोचते. याला प्रतिबंध न केल्यास, शरीराच्या अवयवांमध्ये अत्यंत सूज येते. जगातील १९ देशांमध्ये हत्तीरोगाचे निर्मूलन झाले असून, १० देश निर्मूलनाच्या जवळ आहेत. प्रतिबंधात्मक औषधी वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हा आजार दूर करणे शक्य आहे.

यांना दिली जाणार नाही औषधीफायलेरियासिसपासून लोकांचा बचाव करण्यासाठी निवडक पाच जिल्ह्यांमध्ये औषधी वाटप होणार आहेत. ही औषधी रिकाम्या पोटी घेऊ नयेत, तसेच २ वर्षांखालील मुले, गरोदर महिला आणि गंभीर आजारी व्यक्तींना ही औषधी दिली जाणार नाहीत.- डॉ. राधाकिशन पवार, राज्य कार्यक्रम अधिकारी, फायलेरिया निर्मूलन.

टॅग्स :NandedनांदेडHealthआरोग्य