गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:25 IST2021-06-16T04:25:11+5:302021-06-16T04:25:11+5:30

रोहित गुगले हे क्रेडिट ॲक्सिस ग्रामील लि.मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. सकाळी आठ वाजता बचतगटाच्या बैठकीसाठी ते गेले होते. तेथून ...

The firing shook Nanded again | गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले

रोहित गुगले हे क्रेडिट ॲक्सिस ग्रामील लि.मध्ये केंद्र व्यवस्थापक आहेत. सकाळी आठ वाजता बचतगटाच्या बैठकीसाठी ते गेले होते. तेथून बचत गटाचे ५७ हजार रुपये घेऊन दुचाकीवरून ते परत कार्यालयाकडे येत होते. मिल्लतनगर भागात त्यांची दुचाकी आली असताना पाठीमागून दुचाकीवर दोघे जण तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी गुगले यांच्या दुचाकीसमोर दुचाकी लावून अडविले. दुचाकीची चावी काढून घेत भिंतीवर देशी कट्यातून गोळी झाडली. त्यानंतर रोहित यांच्याकडील ५७ हजार रुपये काढून घेतले. काही मिनिटांतच आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक नीलेश मोरे, उपाधीक्षक सिद्धेश्वर भोरे, उपाधीक्षक चंद्रसेन देशमुख, पोनि. द्वारकादास चिखलीकर, साहेबराव नरवाडे हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, नांदेड शहरात लुटीसाठी गोळीबार होणे हे नित्याचेच झाले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Web Title: The firing shook Nanded again