शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबाराने नांदेड पुन्हा हादरले; युवकावर गोळी झाडून बाप-लेक पोलीस ठाण्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:45 IST

या घटनेने व्यापारी वर्गात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड- जुन्या वादातून शुक्रवारी दिवसाढवळ्या नांदेड शहरात गोळीबाराची घटना घडली. जुना मोंढा भागातील खंडेलवाल स्विट मार्टसमोर उभ्या असलेल्या एका तरुणावर गोळी झाडल्यानंतर आरोपी बाप अन् अल्पवयीन मुलगा स्वत:हून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतूसे जप्त केली आहेत.वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

नांदेडला गोळीबाराची घटना तशी नवी नाही. गावठी पिस्टल सापडण्याचे प्रमाणही अधिक आहे. जानेवारी महिन्यात काँग्रेस कार्यकर्ता सविता गायकवाड हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने स्वतवर गोळी झाडून दोघांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नांदेडात गोळीबाराची घटना घडली नव्हती. उलट पोलिसांनी अनेकांकडून गावठी पिस्टल जप्त केले होते. त्यातच शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्दळीच्या असलेल्या जुना मोंढा परिसरात गोळीबार झाला. सचिन कुलथे रा.गाडीपूरा हा तरुण खंडेलवाल स्विट मार्ट समोर उभा असताना दुचाकीवरुन आलेल्या गजानन बालाजी मामीलवाड याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे यांच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे ते जागेवर कोसळले. 

यावेळी आरोपी मामीलवाड याने सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले होते. त्यानंतर आरोपी बाप-लेक स्वताहून इतवारा पोलिस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेवून जखमी कुलथे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर आरोपी मामीलवाड याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि चार जीवंत काडतूसे जप्त करण्यात आली. या प्रकरणात इतवारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेमुळे जुना मोंढा परिसरात एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, जखमी सचिन कुलथे आणि आरोपी गजानन मामीलवाड यांच्यात पूर्ववैमनस्य होते. त्यातूनच ही गोळीबाराची घटना घडली.

दोघांनी केला होता तलवारीने एकमेकांवर हल्लाकाही वर्षापूर्वी पैशाच्या देवाण-घेवाणीतून सचिन कुलथे आणि गजानन मामीलवाड यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर दोघांनीही एकमेकांवर तलवारीने हल्ला केला होता. या प्रकरणात इतवारा ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले होते. त्यातच काही दिवसापूर्वी पुन्हा त्यांच्यात वाद झाल्यानंतर मामीलवाड याने कुलथे याच्यावर गोळीबार केला.

अल्पवयीन मुलालाही अडकविलेगजानन मामीलवाड याने कुलथेवर गोळीबार करण्यासाठी सोबत दोन गावठी पिस्टल आणि पाच राऊंड घेतले होते. तसेच दुचाकीवर सोबत आपल्या अल्पवयीन मुलालाही घेतले. कुलथे यांच्यावर त्यातील एक गोळी झाडली. परंतु या प्रकरणात आपल्या अल्पवयीन मुलालाही अडकविले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNandedनांदेड