शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

माहुरात फर्निचर गोदामास आग, लाखोंचे नुकसान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 19:01 IST

शहरातील  आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली.

श्री क्षेत्र माहूर (नांदेड ) : शहरातील  आबासाहेब पारवेकर नगर स्थित फायबर फर्निचर साहित्य असलेल्या गोदामास आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. यात फायबर फर्निचरचे साहित्य व गोदामाचे शेड जळाल्याने सुमारे ६० लाख रुपयांचे नुकसान झाले. 

माहूर शहरात आज सकाळी ७ वाजेच्या दरम्यान आबासाहेब पारवेकर नगरात मोठे धुराचे लोळ आकाशात दिसत असल्याने नागरिकांनी धुराच्या दिशेने धाव घेतली. नगराध्यक्ष फिरोज दोसानी  यांचे बंधू जुनेद कादर दोसानी यांच्या फायबर फर्निचरचे गोदामाला आग लागल्याचे दिसून आले.  याची माहिती मिळताच माहूर नगरपंचायतच्या मुख्याधिकारी विद्या कदम, कार्यालय अधीक्षक तथा लेखापाल  वैजनाथ स्वामी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

आग आटोक्यात आणण्यासाठी माहूर न.प.च्या अग्निशमन वाहनाने तीन फेऱ्या करत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ नगरसेवक इलियास बावाणी, न.प. चे स्वच्छतादूत गणेश जाधव व न.प.चे सर्व कर्मचारी व उपस्थित नागरिकांनी बचाव कार्यात झोकून देत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले़ दरम्यान नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांना आग विझवितांना आगीच्या दाहकतेचे चटके लागल्याने किरकोळ  दुखापत झाली.  किनवट, पुसद, उमरखेड येथील अग्निशमन दलाच्या वाहनास पाचारण करण्यात आले.

आगीचा फटका शेजारील  काही घरांनाही बसला. दरम्यान, गोदामात असलेले एकूण ५० लाख रुपये किंमतीचे फायबर खुर्च्या, फोमच्या गाद्या, व फायबर फर्निचर, फ्रीज, कुलर, कपाट, व विक्रीसाठी असलेले गृहउपयोगी साहित्य जळून खाक झाले असल्याचा अंदाज आहे. तब्बल अडीच तास चाललेले आगीचे तांडव अडीच तासाच्या अथक प्रयत्नाने आटोक्यात आले. धुराचे लोळ आर्णी, सारखणी, महागाव फुलसावंगी इथपर्यंत दिसल्याने येथील नागरीकांनी माहूर शहरातील आपल्या नातेवाईकांना दूरध्वनी वरून घटनेबाबत विचारणा केली़

टॅग्स :NandedनांदेडfireआगPoliceपोलिस