शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर मनपा विरोधी पक्षनेते पद दीपकसिंह रावतांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 20:15 IST

भाजपाच्या अंतर्गत वादातून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता़

नांदेड :नांदेड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी भाजपाच्या दीपकसिंह रावत यांची नियुक्ती करण्यात आली़ भाजपातील अंतर्गत वादावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर अखेर महापौर दीक्षा धबाले यांनी निर्णय घेतला आहे़ भाजपा शहराध्यक्ष प्रवीण साले यांच्या उपस्थितीत रावत यांनी विरोधी पदाचा पदभार स्वीकारला आहे़ 

भाजपाच्या अंतर्गत वादातून विरोधी पक्षनेतेपदाचा विषय थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला होता़ सर्वाेच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय कायम ठेवण्याचे आदेश दिले होते़ त्या आदेशानंतर महापौर दीक्षा धबाले यांनी सोमवारी भाजपा नगरसेवकांची बैठक बोलावून त्यांचे म्हणणे जाणून घेतले़ त्यात गुरूप्रीतकौर सोढी यांची अनुपस्थिती होती़ भाजपाच्या उपस्थित सर्वच नगरसेवकांनी विरोधी पक्षनेता म्हणून दीपकसिंह रावत यांना पसंती दिली होती़ महापौरांनी या सुनावणीनंतर विरोधी पक्षनेता म्हणून रावत यांना मान्यता दिली़ याबाबतचे पत्र रावत यांना सुपूर्द केले़ महापौरांनी मान्यता दिल्यानंतर रावत यांनी मंगळवारी आपला पदभार स्वीकारला़ यावेळी भाजपाचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांची उपस्थिती होती़ 

निवडीवर भाजपामधून टीका कॉंग्रेसने केलेल्या या निवडीबाबत भाजपा युवा मोर्चाचे दिलीपसिंघ सोढी यांनी टीका केली आहे़ गुरूप्रीतकौर सोढी यांच्या निवडीच्या ९ महिन्यानंतर भाजपाच्या रावत यांच्यासह इतर पाच नगरसेवकांनी पक्षाच्या आदेशालाच उच्च न्यायालयात आव्हान दिले़ त्यानंतर विधानसभा निवडणुकीत बंडखोर उमेदवाराचा प्रचार केला़ त्यामुळे मतविभाजनातून काँग्रेसचा आमदार निवडून आला़ उच्च न्यायालयाने भाजपाच्या सहा जणांमधून एकाची निवड करण्याचे आदेश महापौरांना दिले होते़ त्यात रावत यांना काँग्रेसने संधी दिली आहे़ यातून काँग्रेसच्या विजयात वाटा उचलणाऱ्या रावत यांना संधी दिल्याची टीका सोढी यांनी केली़

टॅग्स :Nanded-Waghala Municipal Corporationनांदेड - वाघाळा महानगरपालिकाNandedनांदेडBJPभाजपाcongressकाँग्रेस