शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

कंधार तालुक्यात २५ दिवस पुरेल एवढाच चारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 00:48 IST

कंधार : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पशुधन मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्रात पाण्यासाठी गर्दी करतानाचे चित्र ...

ठळक मुद्दे९० हजार पशुधन : पाणीसमस्येतून चाराटंचाईत अडकणारपरिसरातील पशुमालकांना लागली चिंता

कंधार : तालुक्यात पाणीटंचाईने उग्र रूप धारण केले आहे. पशुधन मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्रात पाण्यासाठी गर्दी करतानाचे चित्र आहे. त्यात आता केवळ २५ दिवसांचा चारा शिल्लक असून पावसाचे वेळेत आगमन झाले नाही तर ९१ हजार ७०८ पशुधनाला चाराटंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे पशुपालकांना पशुधनाचे संगोपन करण्याची चिंता सतावत असल्याचे चित्र आहे.सलग काही वर्षे तालुका दुष्काळाचा सामना करत आहे. नागरिक व पशुधनाला पाणीटंचाईने बेजार केले आहे. शेतकऱ्यांना पिकाचा अपेक्षित उतारा मिळत नसल्याने आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढते म्हणून नागरिक व पशुधनाला भटकंती करावी लागते. तालुक्यातील जलसाठे कोरडे पडले आहेत. पाणीपातळी खोल जात असल्याने विंधन विहिरी कोरड्या पडत आहेत. त्यामुळे पशुधनाला मानार नदीकाठावर व जगतुंग समुद्राचा मोठा आधार मिळत आहे. पशुपालक पशुधनाला पाणी देण्यासाठी कसरत करत आहेत.एकोणिसाव्या पशुगणनेनुसार तालुक्यातील पशुधनसंख्या लहान व मोठे मिळून ९१ हजार ७०८ आहे. लहान पशुधन २२ हजार ७५४ आहे. त्यांना प्रतिदिन चारा ३ किलो व पाणी २० लिटर लागते. मोठ्या पशुधनाची संख्या ६८ हजार ९५४ असून प्रतिदिन चारा ६ किलो व पाणी ४० लिटर लागते. पशुसंवर्धन विभागाने न्युट्रीफीड व ठोंबे पुरवठा केला. मका ४०० किलो, ज्वारी ३२० किलो, न्युट्रीफीड २१० किलो व ठोंबे ३ लाख १२ हजार पुरवठा केल्याने हिरवा चारा पशुपालकांना उपलब्ध झाला. हा चारा १ हजार ३५६ मे. टन उपलब्ध झाला व खरीप-रबीपासून ११ लाख ६ हजार १५९ मे. टन उपलब्ध झाला. आॅक्टोबर २०१८ पासून १५ जून २०१९ पर्यंत पुरेल असे पशुसंवर्धन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे.१५ जूनपूर्वी पावसाचे आगमन झाले तर नवीन चारा निर्माण होईल व पशुधनाला आधार मिळेल. अन्यथा चाºयाविना पशुधनाची परवड अटळ आहे. पशुधनाला जगविण्यासाठी ऐन दुष्काळात पशुपालकांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागणार आहे. अन्यथा बेभावात पशुधन विक्री करून चाराटंचाईतून सुटका करवून घ्यावी लागणार आहे.सलग निसर्गचक्राचा फटका सहन करून शेतकरी व पशुपालक मेटाकुटीला आला आहे. चारा उपलब्ध असल्याचे कळविण्यात आल्याने आजतरी चारा छावणीचा विषय नाही. मात्र जून महिन्यात चारा टंचाईचे चटके पशुधनाला झेलावे लागणार असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Nandedनांदेडdroughtदुष्काळNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड